रक्तदान शिबिराला भव्य प्रतिसाद

70

🔸मैत्री परिवार चा उपक्रम

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.16सप्टेंबर):-मित्र गणेश मंडळ व मैत्री जनसेवा बहुउद्देशीय संस्था प्रेरित मैत्री परिवार शिवाजी वार्ड उमरखेड यांच्या सयुंक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, विशेष म्हणजे रक्तदान करणारे रक्तदाते यांचा विचार करत प्रत्येक रक्तवीर याना 500000 (पाच लाख रुपये) किमतिचा एक वर्ष कालावधी असलेला अपघात विमा देण्यात आला.

विदर्भ मध्ये प्रथमच असे झाले की प्रत्येक डोनर ला अपघात विमा देण्यात आला असावा.मित्र गणेश मंडळ व मैत्री जनसेवा बहुउद्देशीय संस्था प्रेरित मैत्री परिवार च्या रक्तदान शिबिरा च्या अवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 75 (पांच्यातर) रक्तविरानी रक्तदाना करत सहभाग नोंदविला.

व भव्य रक्तदान शिबिर पार पडले व तसेच कोरोना काळ आज पन लक्षात घेता मास्क, सेनिटाइजर,
रक्तदात्यांन मध्ये आंतर ठेवत रक्तदाते या कड़े विशेष लक्ष्य ठेवण्यात आले रक्त संकलन है जीविन आधार ब्लड बैंक यानी रक्त संकलन केले तसेच रक्तदान यशस्वी रित्या पार पडण्या साठी मित्र गणेश मंडळ व मैत्री परिवार याचे मोलाचे योगदान लाभले.तसेच मित्र गणेश मंडळ व मैत्री परिवार यानी रक्तदाते व सहकार्य करणाऱ्या सर्व मित्र बंधु चे आभार मानले.