ग्रामदैवत हिंगलाज मातेच्या नावाने नामकरणासाठी ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव मंजूर

26

🔸खेङे गावाचा पुढील कारभारात हिगंलाजनगर नामकरण

✒️नाशिक प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.16सप्टेंबर):-अखंड महाराष्ट्रातील अठरापगड समाजाचे कुलदैवत असलेल्या खेडे उगाव तालुका निफाड येथील जागृत देवस्थान हिंगलाज मातेचा महिमा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात गाजत असून आपल्या गावाचे नाव या ग्रामदैवत हिंगलाज मातेच्या नावावरून ठेवण्यात यावे अशी बऱ्याच दिवसापासून भाविक नागरिक व तरुणांची इच्छा होती.

अखेरीस सरपंच निवृत्ती कोल्हे (सर) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत खेडे गावाचे हिंगलाजनगर नामकरण व्हावे अशी सूचना मांडण्यात आली असता उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन ग्रामदैवत हिंगलाज मातेच्या नावाने हिंगलाजनगर नामकरण करुन दैनंदिन व्यवहारात यापुढे या नावाने गावाचा नावलौकिक वाढवुन ग्रामदेवता हिंगलाज देवी मातेच्या नावाने नामकरणासाठी मंजुरी देण्यात आली.
हिंगलाज देवी मातेचे भारतभर कुलदैवत असलेला अठरा पगड जातीचे लोक दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात त्यामुळे हिंगलाज नगर नामकरण होणे हे आपल्या गावाचं भाग्य आहे असे अनेक जाणकारांनी यावेळी मत व्यक्त केले. अखेरीस ग्रामसभेत सर्वांच्या साक्षीने हा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात येऊन यापुढे खेडे हे नाव वापरात न ठेवता यापुढील सर्व तहसील ,सरकारी कार्यालय, रेशन कार्ड, शैक्षणिक संस्था ,विविध संस्था आदींच्या नावात यापुढे खेडे ऐवजी हिंगलाज नगर नाव करण्यात यावे अशी या ग्रामसभेत एक मुखाने मंजुरी देऊन सर्वांनी या ठरावाला होकार दिला.

सदर सभेस ग्रामपंचायतीचे सरपंच निवृत्ती कोल्हे सर, उपसरपंच कुमारी ऐश्वर्या कोल्हे (पाटील) ग्रा.पं.सदस्य मोतीराम कोल्हे, गोविंद जेऊघाले,सौ.लक्ष्मीबाई कोल्हे, सौ.हिराबाई महाले, सौ.अलका कोल्हे, सौ.वैशाली मेधणे, सौ.सोनाली कांदळकर, प्रमोदजी अहिरे, धनराज पारधे ग्रा पं ग्रामसेवक कुशारे ,ग्रा.कर्मचारी व इतर सर्वच क्षेत्रातील कर्मचारी वृंद तसेच हिंगलाज देवी माता ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे, पाणी वाटप संस्थेचे चेअरमन शिवराम कोल्हे, वि.वि.कार्य.सेवा सोसायटीचे चेअरमन किशोर कोल्हे व संचालक मंडळ ट्रस्टचे सर्व संचालक मंडळ तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड व गावचे प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठया संख्येने सभेस उपस्थित होते.

खेडे गावाचे नामकरणास गावकऱ्यांनी गावातील गट-तट , पक्षीय राजकारण, अंतर्गत हेवे दावे बाजूला ठेवून फक्त गावाचा सर्वांगीण विकास व्हावा व ग्रामदैवताचे नावाने या पुढील कारभार सुरू व्हावा यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला केलेले सहकार्य निश्चितच आदर्श घेण्यासारखे असून हिंगलाज नगर नावाने सुरू झालेल्या या गावकारभाराला व ग्रामविकासासाठी गावातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक ,हिंगलाज मातेचे भक्तगण, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मित्र मंडळ आदींनी असेच सहकार्य करावे असे आवाहन निवृत्ती कोल्हे सर सरपंच हिंगलाजनगर (खेडे)यांनी यावेळी केले.