चला आपल्या प्रभागाला १००% लसीकरण करूया!….

29

🔸मोहिमे अंतर्गत धरणगावात लसीकरणाचे ३,००० डोस चे वितरण….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगाव(दि.16सप्टेंबर):-बुधवार दि. १५ रोजी येथे केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतुन मोठा माळी वाडा मढी परिसर तसेच मोरवाडी कासार गल्ली परिसररात सकाळी 9 ते 5 या वेळात ‘चला आपल्या प्रभागाला १००% लसीकरण करून कोरोनामुक्त करुया..!’या मोहिमे अंतर्गत लसीकरण 3000 कोविशील्ड लसचे डोसेस उपलब्ध झाले होते. त्यानुसार टोकन पध्दतीने लसीकरण करण्यात आले. मोठा माळी वाडा परिसरात माळी समाज मढी मध्ये व्यवस्था झाली.

उदघाटन माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन यांचे हस्ते झाले या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, मा. नगराध्यक्षा उषा वाघ, नगरसेविका सुरेखा विजय महाजन, नगरसेवक कैलास माळी, समाजाचे पंच विजय महाजन, युवा सेना प्रमुख संतोष माळी उपस्थित होते.तसेच मोरवाडी कासार गल्ली परिसरात नगरसेवक प्रविण रघुनाथ चौधरी, नगरसेविका आराधना नंदकिशोर पाटील उपस्थित होते.मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शाखा प्रमुख व सर्व पदाधिकारिंनी मेहनत घेतली.