नाको व्हिलेज:होम स्टे:अनुभव

29

स्पिती valley टूर दिनांक 12 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाला. चंदीगड पासून, शिमला, नारखंडा, राकचम, कल्पा नंतर चा मुक्काम नाको येथे. इतर ठिकाणी हॉटेल मध्ये तर नाको येथे होम स्टे . धरमसिंग नेगी यांचा नेहरू होम स्टे आहे. धरमसिंग नेगी पदवीधर आहेत. त्यांचा मोठा भाऊ नेहरू समाजसेवी आहेत. पब्लिक स्कूल चे सचिव आहेत. लोकांना मदत करतात. संयुक्त कुटुंब आहे. त्यांची मटर ची शेती आणि सेब चा बगीचा आहे.

नाको हे गाव 11820 फूट उंचीवर आहे. हिमाचल प्रदेश च्या kinnaur जिल्ह्यात हे गाव आहे. गावात सोलर दिवे आहेत परंतु बरेचसे बंद दिसले. गाव विकसित आहे असे म्हणता येणार नाही.

होम स्टे म्हणजे एखाद्याच्या घरी , संस्कृती समजून घेणेसाठी राहणे, हॉटेल ऐवजी. चांगली संकल्पना आहे. दुपारच्या जेवणानंतर धर्म नेगी यांनी आम्हाला नाको लेक, मोनेस्ट्री, शाळा आणि गाव फिरून दाखविले. जुनी घरे तोडून लोक चांगली घर बांधत आहेत. काहींनी बांधले. त्याचा वापर अनेक जण होम स्टे साठी करतात. हे एक प्रकारचे हॉटेल च म्हणता येईल.

नाको हे गाव शंभर टक्के बुद्धिस्ट गाव आहे. 150 चे आसपास कुटुंब . ट्रायबल कुटुंब. मटर,आलू,मोठ्या प्रमाणात आणि गहू थोडस पिकवितात. भात होत नाही. सेब चे बगीचे अनेकांकडे आहेत. क्राईम झिरो आहे. लग्न त्याच्या संस्कृती व परंपरेनुसार होतात. प्रेम विवाह, आंतरजातीय विवाहास बंधन नाही आणि विरोध ही नाही असे धर्म नेगी सांगतात. धर्म नेगी सांगतात, रस्ता,बिल्डिंग बांधकामासाठी बाहेरचे लोक येतात.त्यांच्यामुळे कधीकधी काही घडते. स्थानिक लोक बुद्धिस्ट आहेत, ट्रायबल आहेत त्यामुळे क्राईम नाही. दरवर्षी 22 ऑगस्ट ला हमरंग valley फेस्टिवल असते. आजूबाजूच्या 8-10गावचे लोक सहभागी होतात. नाचतात-गातात आनंद साजरा करतात. संस्कृती जपतात.

नाको येथील बुद्धिस्ट मॉनेस्ट्री 11 व्या शतकातील आहे. टुरिस्ट हमखास भेट देतात पण ही दुर्लक्षित आहे. मात्र, लोकसहभागातून काही दुरुस्त्या केल्या आणि नवीन बांधकाम केले. वर्ष2007 मध्ये पूजनीय दलाई लामा नाको येथे आले होते. नाको येथील 11 व्या शतकातील मॉनेस्ट्री मध्ये भिंतीवर जी ऐतिहासिक पेंटिंग्ज होती त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नष्टप्राय होत आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

ग्रामपंचायत आहे. कोविड मुळे सगळे लोक मास्क वापरताना दिसले. आम्ही पण मास्क वापरून प्रवास करीत आहोत. कोविड मुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहे.शाळेच्या भिंतीवर वंदे मातरम आणि राष्ट्रगीत लिहिले आहे. संविधान दिवस 26 नोव्हेंबर ला 2015 पासून देशभर साजरा होत आहे. सर्व शाळा महाविद्यालयात संविधान प्रास्ताविका Preamble वाचली जाते . शाळा महाविद्यालयात Preamble भिंतीवर लिहावे, स्तंभ उभारावा, प्रदर्शित करावे असे निर्देश दिले तरीपण Preamble शाळेत दिसले नाही. पब्लिक स्कूल सुद्धा दिसली. पब्लिक स्कूल चे सचिव नेहरू नेगी यांना आम्ही विनंती केली की Preamble प्रदर्शित करून दररोज वाचन सुरू करावे.
एकूणच, गाव छान, लोक छान, आनंदी. चांगला अनुभव. आम्ही चार लोक टूर वर आहोत.

✒️इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि(संविधान फौंडेशन नागपूर)मो:-9923756900
Dt: 15 सप्टेंबर2021