कुंडलवाडी-बिलोली रस्त्यावर खड्डेच खड्डे

🔹सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…

✒️अशोक हाके(बिलोली ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.16सप्टेंबर):-गेल्या अनेक दिवसापासुन कुंडलवाडी बिलोली मार्गावर मुख्य रस्त्यावर ठीकठीकाणी गिट्टी उखडून गेल्याने मोठमोठे खड्डे पडले अाहेत.काही दिवसापूर्वी खड्यामध्ये मुरूम टाकुन थातुर मातुर काम करून खड्डे बूजवण्यात आले होते. सद्या आज घडीला येसगी पूलाला तडा पडल्याने पूर्ण वाहतुक बोधन,निझामाबाद, हैद्राबादकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी टाकल्याने सर्व वाहने बिलोली,अर्जापूर,कुंडलवाडी,धर्माबाद या मार्गाने तेलंगनात नाही लाजास्तव जावे लागत आहे.या मार्गावर वाहनांचा वर्दळ मोठ्याप्रमाणात चालु असल्याने रस्ता खुपच खराब होऊन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्याच्या खडडयात पाणी साचल्याने वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.पायी जाणा-या पादचा-यांनाही नाहाक त्रास सहन करावे लागत आहे..या खड्याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.त्वरीत संबंधीत विभागाने लक्ष घालुन रस्त्यावरील खड्डे बूजविण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांतुन होत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED