तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा – राष्ट्रीय किसान मोर्चा

🔸कृषी विषयक काळे कायदे रद्द करा – तालुकाध्यक्ष गोरख देशमुख…

✒️ धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगांव(दि.16सप्टेंबर):- आज दि. १६ सप्टेंबर २०२१ गुरूवार रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी – देशाच्या पोशिंद्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर हून राष्ट्रीय किसान मोर्चा चे हे आजचे आंदोलन भारतातील ५६० जिल्ह्यात देशव्यापी आंदोलन करण्यात आले. धरणगावात रॅलीची सुरवात छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून झाली व तहसिल कार्यालय येथे निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सर्वप्रथम कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला धरणगाव शहरातील व ग्रामीण भागातील शेतकरी वाल्मीक पाटील, गोरख देशमुख, लक्ष्मण पाटील, निंबा कुंभार, भागवत चौधरी, भुषण माळी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. बहुजन महापुरुषांचा म्हणजेच शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून रॅली सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये कोरोना नियमांचे पालन करून शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणा दिल्या. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याच्या विरोधातील काळे कायदे रद्द करा, शेतकऱ्याला न्याय द्या.

शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या !… अशा विविध घोषणा देत उड्डाणपुलावरून तहसिल कार्यालयापर्यंत शांततापूर्वक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिल कार्यालयाचे तहसिलदार नितीनकुमार देवरे साहेब यांना सादर केले. आमच्या समस्या या देशाचे महामहीम राष्ट्रपती यांच्यापर्यंत आपल्या मार्फत या सर्व मागण्या पोहोच कराव्यात अशी विनंती शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी केली. याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक – आबासाहेब राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष – गोरख देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार यांनी विविध घोषणा दिल्या.राष्ट्रीय किसान मोर्चाच्या रॅलीला पोलीस प्रशासनाने सहकार्य लाभले, यामध्ये मिलिंद सोनार, वैभव बाविस्कर,पोहेकॉ. विनोद संदानशिव, पोहेकॉ. बाळासाहेब बडगुजर यांनी मोलाचे सहकार्य केले.

याप्रसंगी वाल्मीक पाटील (बाभळे), महेंद्र भोई, रामचंद्र पाटील, भागवत चौधरी, जितेंद्र चौधरी, श्रीकांत पाटील, प्रल्हाद महाजन ( मोठा माळीवाडा ), अरविंद चौधरी, अरुण पाटील, अरविंद पाटील, विजय पाटील, भुषण माळी, चत्रु मराठे, गोपाल चौधरी, दिगंबर पाटील, गोपाल चौधरी, रविंद्र गजरे, दिनेश पाटील ( पत्रकार ), शामराव महाजन, दीपक मराठे, शरद गांगापुरी, भाऊसाहेब महाजन (विवरे), राजुभाऊ पाटील (गंगापुरी), ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य व बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, भारत मुक्ती मोर्चा चे तालुकाध्यक्ष – गौतम गजरे, महात्मा फुले हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार व धरणगाव शहरा तसेच ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा तसेच धरणगाव शहर आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED