बिलोली तालुक्यातील 48 हजार हेक्टरमधील पिके अतिवृष्टींमुळे धोक्यात…

31

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.16सप्टेंबर):- तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 48 हजार हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसुल विभागाने व्यक्त केला आहे.नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण चालु आहे.आतापर्यंत तलाठी,ग्रामसेवक,व कृषि सहायक यांनी केलेल्या सर्वे बाबत तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी आढावा बैठक घेतली,यात अजूनही 50 टक्केच्यावर शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे.

सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात अतिवृष्टी झाली.यात बिलोली तालुक्यात जवळपास 48 हजार हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगीतले.

दरम्यान तलाठी,ग्रामसेवक,व कृषी सहायक यांच्याकडून प्रभावी क्षेत्राचे सर्वे चालु असल्याचे म्हटले आहे.प्रभावी 48 हजार हेक्टरमधील 30 हजार जिरायती 250 हेक्टर बागायती व उर्वरीत क्षेत्र इतर पिकांचे असल्याची माहीती तहसीलदारांनी दिली आहे.पिकांच्या सर्वेक्षणाची सद्याची स्थीती जाणुन घेण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी तलाठी,ग्रामसेवक,व कृषी सहायक यांची आढावा बैठक घेण्यात आली.यात आजूनही सतत पाऊस येत असल्याने अडचणयेत आहे.असा सुर जवळपास सर्वांनीच व्यक्त केला आहे.त्यामुळे अद्याप 50 टक्केच्यावर सर्वेक्षण शिल्लक असल्याचे समोर आले आहे.