उपवनसंरक्षकांचा अजब कारभार,स्वतःची चौकशी स्वतःच करणार..!

🔹स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसतांना लढविली शक्कल..

✒️प्रतिनिधी बुलडाणा(मनोज नगरनाईक)

बुलढाणा(दि.17सप्टेंबर):-असंख्य तक्रारी आणि कार्यालयीन चौकशांच्या ससेमि-यात अटकलेले बहुचर्चित बुलडाणा जिल्ह्यातील उपवनसंरक्षक अक्षय गजभिये. यांचा गैरकायदेशीर मनमानी कारभार आणि बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनी राज्यात आक्रोश मोर्चा काढून केली होती.

सदर मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडेच वन विभाग असल्यामुळे त्यांच्या कार्यालया अंतर्गत सदर प्रकरणाची चौकशी सूरू आहे.असे असतांना वरिष्ठांचे कोणतेही आदेश आणि सूचना नसतांना स्वतःवरील आरोपांची स्वतःच चौकशी करण्याचे बेकायदेशीर आदेश काढून तक्रारदारांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रकार बुलडाणा वन विभागाकडून होत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे.सदर नोटीसमध्ये तक्रारकर्ते आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस देत पुरावे सादर करण्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे 15/09/2021 ला दू. 3.00 वा.प्राप्त नोटीस नुसार 15/09/2021 रोजीच चौकशी नेमण्यात आली.
तर त्याच दिवशी बुलडाणा उपवनपाल अक्षय गजभिये सकाळी साडे अकरा वाजेपासून दौरा टाकून निघून गेले. सदर प्रकारामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार वन विभागाने त्वरित बंद करावा, तसेच दहा मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे पत्र सुद्धा यावेळी तक्रारदार यांच्यावतीने देण्यात आले. तर या बेकायदेशीर नोटीस विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती तक्रारदार ऍड रोटे यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED