महात्मा गांधी व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुशांच्या स्मारकांचा लोकार्पण सोहळा

32

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.17सप्टेंबर) आपण सर्वजन देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करीत आहोत.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी अमृल्य योगदान दिले असे महात्मा गांधी भारतीय लोकशाहीच्या स्थापनेत अनमोल योगदान दिले असे घटनाकार,
*भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकसहभागातुन निर्माण झालेल्या भव्यदिव्य पुतळ्याचे व नगरपरिषद उमरखेडच्या वतीने करण्यात आलेल्या सुशोभिकरण व नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. १८- सप्टेंबर -२०२१ रोजी सकाळी १०.३० वा. मान्यवरांच्या उपस्थीत संपन्न होणार आहे.*

या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटक मा.ना.श्री . *रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक मंत्री, माजी मंत्री तथा आमदार मदनभाऊ येरावार, मा.आ.उत्तमराव इंगळे, प्रमुख उपस्थिती आ.नामदेवराव ससाने, आ.निलय नाईक,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, अरविंदजी भोयर, महेंद्रजी मानकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.हेमंतभाऊ पाटील,डाॅ.आ*.
*रणजितजीत पाटील*,जिल्हा प्रमुख पराग पिंगळे हे उपस्थित राहतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य पुतळ्याने औदुंबर नगरीच्या शिरपेचात मानाची भर होणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे.