साताळी येथे कोविड लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

23

✒️संदिप सोनवणे(येवला प्रतिनिधी)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.१७सप्टेंबर):-साताळी तालुका येवला येथे covid-19 लसीकरणाचा कॅम्प दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कोविड चे लसीकरण डोस पहिल्यांदा श्री तात्याभाऊ सोनवणे यांना देताना साताळी चे सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पोलिस पाटील, विविध कार्यकरी सोसायटीचे चेअरमन, व्हाईसचेअरमन व संचालक मंडळ तसेच ज्येष्ठ नेते गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावामध्ये दोनशे डोस उपलब्ध असल्याने दोनशे लाभार्थी यांचे लसीकरण झाले. यावेळी प्राथमिक शिक्षक, ग्रामपंचायत शिपाई तसेच आरोग्य विभागाची टीम यांनी अतिशय मोलाचे सहकार्य देऊन गावात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. एकदम हशी खेळीत कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.