जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

27

🔺आदेश देऊनही अंमलबजावणी होईना

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18सप्टेंबर):-तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा विभागाच्या वतीने अक्षय गॅस एजन्सी ग्राहकांना गॅस पुरवठा करत असताना जास्तीचे शुल्क आकारत असल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी 3 सप्टेंबर 2021 रोजी आदेश काढला गॅस डिलिव्हरी करत असताना डिलिव्हरी करत असलेली रिक्षा यावर निर्धारित मूल्य सूचना फलक लावुन ग्राहकांना घरपोच सुविधा देण्यात यावी आज परिस्थितीला आदेश काढून 14 दिवस पूर्ण होत आहेत तरीही गंगाखेड येथील अक्षय गॅस एजन्सीने आज पर्यंत घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या रिक्षावर कोणत्याही प्रकारची सूचना फलक लावण्यात आलेले नाही.

त्यामुळे गंगाखेड तहसीलदार पुरवठा विभागाकडे लक्ष देतील का? अशी जनमानसामध्ये चर्चा आहे. तसे पाहता शहरातील प्रत्येक हॉटेलमध्ये गॅस डिलिव्हरी होत असल्याचे दिसून येते अक्षय गॅस एजन्सी या विभागात सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे नवीन गॅस कनेक्शन बाबत विचारणा केली असता नवीन गॅस कनेक्शन देणे बंद आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी यांना गॅस वितरणाबाबत निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर राहुल साबणे, यांची स्वाक्षरी आहे.