येवला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन

30

✒️प्रतिनिधी नाशिक(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.18सप्टेंबर):- आज रोजी येवला तालुका वचिंत बहुजन आघाडी वतीने भारताचे राष्ट्रपती ना निवेदनद्वारे खालील मागण्या पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती बंद आहे.ही सैन्य भरती तातडीने सुरू करावी अशी आमची मागणी आहे. सैन्य भरती सुरू न केल्यास वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा ह्यांचे नेतृत्वाखाली आणि प्रदेश पदाधिकारी ह्यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संसदेला घेराव घालण्यात येईल.अशा मागणीचे निवेदन येवला तहसीलचे पुरवठा अधिकारी हावळे साहेब यांना वंचितचे भाऊसाहेब अहिरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी भाऊसाहेब अहिरे यांनी की,केंद्र सरकारने गत दोन वर्षांपासून सैन्य भरती बंद केली आहे. सैन्यात दाखल होण्याची इच्छा असणाऱ्या हजारो तरुणांनी पोलिस सैन्य भरतीची तयारी केली आहे.मात्र तयारी करणारे तरुण हवालदिल आहेत.सबब सैन्य भरती त्वरीत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक बनली असून सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निवेदन देण्यात येत आहेत.तसे आदेश जिल्हा शहर युवा पदाधिकारी ह्यांना प्रदेश युवक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांनी दिले आहेत.केंद्र सरकारने तातडीने सैन्य भरती सुरू करावी अन्यथा संसदेला घेराव घालू असा इशाराही प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांनी निवेदनद्वारे दिला आहे.

देशातील सैन्य भरती गत दोन वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी एज बार होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सैन्य भरती करावी, ह्यासाठी सदर निवेदन आहे.सैन्य भरती तातडीने सूरु व्हावी. तातडीने सैन्य भरती सुरू करण्यात यावी, पाच वर्ष सैन्य भरतीची वयोमर्यादा वाढविण्यात यावी. निमलष्करी दलात एक लाख २७ हजार पदे रिक्त असताना केवळ २५ हजार पदांसाठी शासनाने भरतीची जाहिरात काढली आहे. ती जाहिरात पूर्ण एक लाख २७ हजार पदांसाठी काढण्यात यावी, वर्षाला किमान दोन भरती घ्याव्या.अश्या मागण्या युवा आघाडी करीत आहे.

तात्काळ सैन्य भरती केली नाही तर, राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहूजन युवा आघाडी मोर्चे काढेल. तरीही सैन्य भरती सुरु न झाल्यास वंचित चे युवा पदाधिकारी आणि विद्यार्थी ह्यांना सोबत घेऊन दिल्लीतील संसदेला घेराव घालण्यात येईल, असा इशारा यावेळी युवा आघाडीचे वतीने दिला जात आहे.दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती बंद आहे.ही सैन्य भरती तातडीने सुरू करावी अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने भाऊसाहेब दगु अहिरे,संदिप जोंधळे,मुक्तार तांबोळी,राम कोळगे,जितेश पगारे,समाधान धिवर,राजु गुंजाळ,अविनाश धिवर,प्रशांत शिंदे,सागर राऊत,अमोल मांजरे,अरबज चौधरी,महेश गायकवाड,प्रवीण लाटे आदींसह कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.