कृषी विज्ञान केंद्र येथे जि. प. उपाध्यक्षा सौ कमलताई जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पोषण बाग महाअभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

26

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि 18सप्टेंबर):- कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा येथे आंतरराष्ट्रीय पोषण बाग महाअभियान व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज दि. १७/९/२१ रोजी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ कमलताई जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ सी पि जायभाये कार्यक्रम समन्वयक, कृषी आधीक्षक नरेंद्र नाईक, संशोधक डॉ कानोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना दीर्घायु रोपांचे वाटप करून परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना उपाध्यक्षा सौ कमलताई बुधवत यांनी वृक्षरोपण व जतन करण्याबाबत आवाहन केले.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बंधू आणि भगिनी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी उपस्थित होते.