धरणगाव नगरपालिकेच्या श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️पी.डी. पाटील(धरणगाव,विशेष प्रतिनिधी)

धरणगाव(दि.18सप्टेंबर):- शहरात सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक पध्द्तीने साजरा व्हावा यासाठी धरणगाव नगरपरिषद विविध उपक्रम राबवित आहे.शहरात गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गणपती विसर्जन करण्यात येते. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत धरणगाव नगरपरिषदेने शहरात द्वारका दास विहीर, तेली तलाव, वाणी मंगल कार्यालय या ठिकाणी श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र तसेच महात्मा गांधी उद्यान येथे श्री गणेश मूर्ती विसर्जन साठी कृत्रिम तलाव उभारण्यात आलेला होता.

गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे सुध्दा संरक्षण, संवर्धन व्हावे यासाठी गणेश भक्तांनी आपली गणेश मूर्ती संकलन केंद्र अथवा कृत्रिम तलावात विसर्जित करावी असे आवाहन नगरपरिषदेने केले होते. त्यास धरणगाव शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद देत शहरातील एकूण *२४५ गणेश भक्तांनी* आपले गणपती संकलन केंद्र आणि कृत्रिम तलावात विसर्जित केले.तसेच शहरातील महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेत मंडळासह सभोवतालचे २० श्री गणेश मूर्ती बालाजी मंदिराजवळ संकलित करून नगरपालिकेच्या श्री गणेश मूर्ती संकलन रथामध्ये जमा केल्या.

यावेळी श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रावर आणि कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करणाऱ्या सर्व गणेश भक्तांना माझी वसुंधरा अभियान अंतर्गत *”माझी वसुंधरा मित्र”* म्हणून सन्मानित करत प्रमाणपत्र देण्यात आले.
त्याचप्रमाणे नगरपरिषदेमार्फत गणपती उत्सवातील *निर्माल्य संकलन करून त्यापासून कंपोस्ट खत* तयार करण्यात येणार आहे.त्यासाठी शहरातील सर्व श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रावर निर्माल्य कलश ठेवाव्यात आलेला होता त्यात आज रोजी जवळपास *५० किलो निर्माल्य* संकलन करण्यात आले असून त्यापासून *कंपोस्ट खत निर्मिती* करण्यात येणार आहे.सदर उपक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक संजय मिसर,निलेश वाणी, शेख शमशो द्दी न, रामकृष्ण महाजन, आण्णा महाजन, अजय सोनवणे, वासुदेव पाचेरवार,शुभम पचेरवार,राज सुरती, भरत चंदाले,रविकांत वाघमारे, संजय महाजन, अरुण पाटील, दशरथ महाजन यांनी मेहनत घेतली तर नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन यांचेसह सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे सहकार्य लाभले.

धार्मिक , महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक
©️ALL RIGHT RESERVED