विद्यमाने पोषण वाटिका महाअभीयान अंतर्गत भाजी बीयाणे वाटप व पशुरोग निदान आणि चिकित्सा शिबिर

27

✒️राजेश सोनुने(नागपूर,विशेष प्रतिनिधी)मो:-9767355533

नागपूर(दि.18सप्टेंबर):- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी ता. कळमेश्वर जि . नागपूर आणि पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती रामटेक, जि. नागपूर यांच्या सयुक्त विद्यमाने पोषण वाटिका महाभियान या अभियानाअंतर्गत इफको द्वारा प्रायोजित भाजी बीयाणे वाटप आणि पशुरोग निदान आणि चिकित्सा शिबिराचे आयोजन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, हिवरा बाजार, ता. रामटेक, जि. नागपूर अंतर्गत मौजा बेलदा येथे दि १७ सप्टेंबर २१ रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमात ५० शेतकऱ्यांना भाजी बीयाण्यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी बेलदा गावातील 200 पेक्षा जास्त जनावरांना लसीकरण आणि उपचार करण्यात आले. डॉ सारीपुत लांडगे, वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख यांनी जनावरांचे व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. इफको चे श्री राहुल नखाते यांनी नॅनो यूरिया बद्दल मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (वि.) डॉ अश्विनी गडमडे यांनी पशुआरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 हिवरा बाजार येथील पशुधन विकास अधिकारी डॉ प्रिती सिरसाट यांनी विभागातील विविध योजनांबद्दल माहिती दिली. बेलदा गावचे सरपंच श्री उमेश भांडारकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले आणि ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचलानालाय येथे कार्यरत तांत्रिक अधिकारी डॉ. प्रज्ञेय ताकसांडे यांनी पशुपालकांना आहार विषयक मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले. डॉ अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण , महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, डॉ सोमकुवर, सहयोगी अधिष्ठाता, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि श्रीमती शांताबाई कुमरे जिल्हा परिषद सदस्या, नागपूर यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वीरबॅक कंपनी तर्फे या कार्यक्रमाकरिता औषधी उपलब्ध करण्यात आल्या