दिग्दर्शक व अभिनेत्री वर भादवी. 395 दाखल करा – दादासाहेब शेळके यांची मागणी

✒️चक्रधर मेश्राम(विशेष प्रतिनिधी)

नागपूर(दि.18सप्टेंबर):-सध्या स्टार प्रवाह टीव्ही चैनल वर” सुख म्हणजे नेमकं काय असतं” हि मालिका चालू असून दि.१४/०९/२०२१ मंगळवार च्या मालिकेतील एका एका भागामध्ये मध्ये एक निर्बुध्द महिला अभिनेत्री ( चोर असलेली पात्रात ) साडी व ब्लाउज घालुन कोर्टात हजर होते. तेंव्हा त्या ब्लाऊज वर तथागत गौतम बुद्धांचे चित्र वापरले असल्यामुळे जगातील सर्व बौध्द अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. मुळातच ज्या तथागत गौतम बुद्धाने जगातील समस्त मानव जातीच्या हितासाठी व सुखासाठी…

१) त्रिसरण २) पंचशील ३) चार आर्य सत्य ४) अष्टांगिक मार्ग ५) दहा पारमिता दिले असून शांती,सत्य,विज्ञान आणी निसर्गाचे प्रतीक असलेल्या तथागत बुद्धांचे ब्लाऊज वर चित्र फोटो वापरणे अत्यंत खेदजनक असून अश्या प्रकारामूळे महापुरुषाचा अवमान झाला आहे. त्यामुळे भारत व जगातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

त्यामुळे संबंधित star प्रवाह टीव्ही चे मालक, सिरियल चे डायरेक्टर, अभिनेत्री,डिझायनर इ.भारतीय दंड विधान 295 व 295 अ नुसार गुन्हा दाखल करून संबंधितास तात्काळ अटक करावी व तो भाग काढून टाकण्यात यावा अशी मागणी भिम टायगर सेनेच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आलेली आहे. जर गुन्हा दाखल नाही झाला तर भिम टायगर सेना या क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भिम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके गृहमंत्री यांना दिला आहे.

नागपूर, महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED