गडचिरोली शहरातील गटार कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार?

87

🔺उच्चस्तरीय चौकशी होणार का❓

🔺अनुप मेश्राम यांनी केली चौकशीची मागणी.

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.18सप्टेंबर):-गडचिरोली शहरातील अनेक वाडाऀत गटार लाईन चे काम सुरू केले असून फुले वार्डात होत असलेल्या गटार पाईप लाईनच्या कामाच्या चौकशीची मागणी. अनुप मेश्राम यांनी केली आहे. शहरातील सदर कामें करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत , फुले वार्ड क्रमांक 2 मध्ये होत असलेले गटार पाईप लाईनची कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाचे असून लवकरच भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. कामावर देखरेख करणारे संबंधित ठेकेदाराने गटार पाईप लाईन टाकताना एस्टिमेट प्रमाणे नालीचे खोदकाम केलेले नसून नाली च्या आत मध्ये टाकलेल्या लेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती आणि गीट्टीचा वापर केलेला आहे. नालीचे खोदकाम हे सरळ न करता वाकडे तिकडे आहे त्या स्वरूपात खोदकाम केलेले असून नाली मध्ये गटार पाईप हे दर्जेदार कंपनीचे न वापरता हलक्या दर्जाचे वापरून जनतेची दिशाभुल केली जात आहे.

संबंधित गटार पाईपचे कामे करताना होत असलेल्या कामावर नगरपरिषद अभियंत्याचे देखरेख सुद्धा नाही . शहरात आणि फुले वार्डात होत असलेल्या व आतापर्यंत झालेल्या संपूर्ण गटार पाईप लाईन कामाच्या चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केलेली असून संबंधित ठेकेदाराची देयके रोकण्यात यावे. वार्डात होत असलेले व आता पर्यंत झालेल्या संपूर्ण कामाची उधळपट्टी करून दुसऱ्यांदा नव्याने गटार पाईपचे कामे नव्याने करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.