डॉ.अजय दादा धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न

29

🔹कृषी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18सप्टेंबर):-येथील कृषी महाविद्यालय,इंजिनीअरिंग (पॉलटेक्निक)कॉलेज,अन्नतंत्र महाविद्यालय (फुड टेक्नॉलॉजी),डी.फार्मसी कॉलेज,बी.फार्मसी कॉलेज,महेश आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय,नर्सिंग कॉलेज,कृषी तंत्रनिकेतन कॉलेज यांच्या संयुक्त कृषी महाविद्यालयात ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.यावेळी युवा नेते डॉ.अजय दादा धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.याप्रसंगी डॉ.अजय दादा धोंडे यांनी राज्यशास्त्र या विषयात पी.एच.डी करुन डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल आनंद शैक्षणिक संकुल मधील सर्व महाविद्यालया तर्फे संयुक्त सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे ध्वजारोहन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमरावजी धोंडे,प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी. राऊत,दत्तात्रय गिलचे,प्रा.शिवदास विधाते,कृषी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य काळे पी.आर.,बी.फार्मसी व डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सुनिल कोल्हे,इंजिनीरिंगचे प्राचार्य संजय बोडखे,अन्नतंत्र कॉलेजचे प्राचार्य साईनाथ मोहळकर,महेश आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ.मोहीनी चंद्रकांत गोसावी,कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य,नर्सिंगच्या प्राचार्या झगडे मॅडम व सर्व कॉलेजचे प्राध्यापक,कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.मिसाळ एल.एस.,तर आभार खेमगर बी.बी.यांनी मानले.