कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुमेरसिंग यांची डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला भेट

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18 सप्टेंबर):-स्थानिक: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुमेरसिंग 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी नागपुर यांनी काल दिनांक 17 .9. 2021 शुक्रवारला सुभेदार मेजर दिनेश चंद्रा, सुभेदार मेजर दुनि चांद, हवालदार रामदास तिवाडे हवालदार कुलबीर सिंग यांच्यासह महाविद्यालयाच्या एन सी सी विभागाला भेट दिली.

त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अझीझूल हक ,एन सी सी असोसिएट ऑफिसर लेफ्टनंट सरोज शिंगाडे , पर्यवेक्षक एस. व्ही.रामटेके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुमेरसिंग यांनी एनसीसी ऑफिसला भेट देऊन कॅडेट शी संवाद साधला. कॅडेटसला एन सी सी चे महत्व समजावून भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्यांच्या कक्षात विविध विषयांवर चर्चा होऊन लेफ्टनंट कर्नल सुमेर सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत निरोप घेतला. लेफ्टनंट सरोज शिंगाडे असोसिएट एनसीसी ऑफिसर 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी नागपुर यांनी आभार व्यक्त केले.