गोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा

24

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18सप्टेंबर):-गाय आणि गोवंश हा शेतीचा आत्मा आहे. गोवंश टिकला तरच शेतकरी टिकणार आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मंजूताई दर्डा यांनी शुक्रवारी ईसाद येथे संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव च्या वतीने आयोजित गोदान कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून बोलताना केले.

शिवस्मारक ईसाद या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता नियमितपणे दर शुक्रवारी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित शिववंदना कार्यक्रमात गोदान कार्यक्रम पार पडला. गावातील युवक श्रवण पांचाळ यास संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव यांच्या वतीने गाय सांभाळण्यासाठी दान देण्यात आली. शेतकऱ्यांनी गायी सांभाळणे अवघड झाल्याने आपल्या गायी कत्तलखान्याकडे न विकता गोशाळेकडे द्याव्यात. गोशाळेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात गरजू व गाई वर प्रेम असणाऱ्या शेतकऱ्यांना गाय विनामूल्य दान म्हणून देण्यात येणार आहेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

यावेळी ह भ प निवृत्ती महाराज ईसादकर, ह भ प रोहिदास महाराज मस्के, हभप प्रभाकर महाराज बचाटे, ह भ प आकाश महाराज खोकले, भोलारामजी कांकरिया सेवा ट्रस्ट अध्यक्ष मंजुषा ताई दर्डा ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शिवसेना नेते सुभाषराव देशमुख, संत मोतीराम महाराज गोशाळा गोपिचंदगड पडेगाव चे संचालक, तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर निवृत्तीराव भेंडेकर, प्रमोद उटेकर, जयवंत कुंडगीर, बाळासाहेब टेकाळे, मुंजाभाऊ लांडे, लक्ष्मण देवकते, जयराम देशमुख, रामेश्वर बचाटे ,केशव नागरगोजे, निवृत्ती बडे, भगवानआबा भोसले, हरिभाऊ महाराज, पूजा दर्डा, सौ पेकम आदींची उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीधर सातपुते, यश भोसले, नरेंद्र भालेराव , श्रावण पांचाळ राजेश भोसले, विजय भोसले ,राहुल भोसले, रामा नेजे ,प्रभाकर मोक्कपल्ले, रोहित कानडे, वैभव भोसले, सतीश बरवे ,गोविंद भोसले गणपत भोसले ,जगन्नाथ भोसले, दिगंबर सातपुते, कल्याण भोसले, यांच्यासह गावातील युवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले यांनी केले.