कोरोणाच्या तिस-या लाटेचे साक्षीदार होऊ नका -सपोनि करीमखान पठाण

31

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-९९७०६३१३३२

बिलोली(दि.18सप्टेंबर):-संपूर्ण विश्वाला हादरून टाकणाऱ्या १९ कोविडच्या प्रादुर्भावाने देशभरात भयावह परिस्थिती झाली असताना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करून आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, सफाई कामगार, पत्रकार आदी प्रमुख घटकाने यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे कोरोणाच्या महामारीतुन आपण आपले आरोग्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न केले आहे.१८ ते ४५वर्षावरील सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करणे काळाची गरज आहे. कोरोणाच्या काळात काही कुटुंबांना कोरोणाचा कमी-जास्त प्रमाणात फटका बसला असून बहुतांश कुटुंबाची अवस्था दयनीय झाली आहे.

पुन्हा एकदा कोरोणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असल्याची चर्चा सुरू असून अनेक तज्ञांनी तिसऱ्या लाटेचे लहान बालकांना अधिक धोका असल्याचे वर्तविले आहे.त्यामुळे आपण आपली व आपल्या परिवाराची व घरातील लहान थोरांचे विशेष काळजी घेणे तितकेच गरजेचे बनत चालले आहे. सध्या परिस्थितीत कोरोणाची स्थिती बर्‍यापैकी सुधारली असली तरी लाँकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णांत वाढ होऊ नये म्हणून आपण फाजील विश्वास न बाळगता कोरोना काटेकोरपणे शासनाचे नियम पाळून सुरक्षितता घेतली पाहिजे संभाव्य तिस-या लाटे चा सामना करण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्न लाटेत आरोग्य तज्ञाकडून संवेदनशील असल्याचे सांगितले जात असले तरीही आपण आपल्या घरातील लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

यातून सावरायचे असेल तर कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे याच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला सर्व जनतेने मोठ्या धीराने नियमांचे काटेकोरपणे पालन केले कोरोणाच्या पहिल्या व दुस-या लाटेला सर्व जनतेने मोठ्या धीराने तोंड दिले.सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले.कोरोणाची तिसरी लाटही पहिल्या दोन्ही लाटेपेक्षा अधिक तीव्र असल्याचे बोलले जात असुन गुणाकाराने वाढणारा हा १९ संसर्ग आपल्या सर्वांना मोठ्या धैर्याने आत्मविश्वासाने सामना करून आरोग्याची काळजी घेतली पाहीजे.कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी मास्क,सँनीटायझर,नियमित वापर करून सुरक्षित अंतर ठेवून विनाकारण गर्दीच्या ठीकाणी जाणे,विनाकारण फिरणे टाळले पाहीजे.

ही सर्व आपल्या व आपल्या कुटूंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.कारण येणारा काळ सांगुन येणारा असल्याने आपण वेळीच सावधाण राहीले पाहीजे.विषेश करून कोरोणाला सर्वांनी हलक्यात न घेता परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन होणा-या सर्दी,पडसे,डोकेदुखी या संसर्गजन्य आजाराचे लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांना भेटून योग्य तो सल्ला घ्यावा व कोरोणाच्या तिस-या लाटेचे साक्षीदार होऊ नका असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण व पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांनी जनतेस केले आहे.