राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाभर वाढविणार – आमदार इंद्रनील नाईक

52

🔹आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.18सप्टेंबर):-आगामी जि. प. व पंचायत समिती तसेच नगर परिषद च्या निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची तयारी ठेऊ असे मत आमदार इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले . यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या च्या वतीने जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांची जिल्ह्यातील जेष्ठ नेते व स्थानिक प्रदेशचे पदाधिकारी यांनी आढावा बैठक सहकार भवन आर्णी रोड यवतमाळ येथे दिनांक १८ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.

या बैठकीचे अध्यक्ष म्हणून पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार संदीप बाजोरिया , प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील , जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर यवतमाळ जिल्हा निरीक्षक अशोक परळीकर , प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर , नानाभाऊ गाडबैले , सौ क्रांती धोटे राऊत , प्रदेश संघटिका वर्षा निकम , प्रदेश सरचिटणीस रियासत अली , महिला निरीक्षक ज्योती देशमुख , प्रदेश युवक सरचिटणीस करण ढेकळे प्रदेश युवती उपाध्यक्ष मनीषा काटे महिला जिल्हाध्यक्ष सौ .सारिका ताजणे सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आला. त्याचबरोबर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पदी सौ. प्रियंका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामधले प्रश्न आणि पक्ष वाढी संदर्भात मान्यवरांची चर्चा विनिमय करून संवाद साधला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी निवडणुकी संदर्भात विविध अडीअडचणींवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपापले विचार व्यक्त केले.

पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मतभिन्नता असली पाहिजे मात्र भिन्नता नसली असायला हवी असे परखड मत माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी मांडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हाच खरा शेतकऱ्यांचा पक्ष असून सर्वसामान्यांचा पक्ष असल्यामुळे मी परत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलो याचे मला समाधान आहे आगामी निवडणुकाचे निकाल राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे चांगलेच लागतील अशी आशा बाबासाहेब गाडे पाटील यांनी व्यक्त केली . आढावा बैठकीचे आयोजन चांगल्या पद्धतीने केले असल्यामुळे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचेही कौतुक यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण तर आभार प्रदर्शन मनीषा काटे यांनी केले.