निरोप समारंभ, शिक्षक गुणगौरव तथा कोविद योद्धा सत्कार समारंभ

🔸केंद्रप्रमुख टी आर महल्ले यांचा सपत्नीक सत्कार

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी प्रतिनिधी)

गोंडपीपरी(दि.19सप्टेंबर):-कारमेल अकादमी तारसा खुर्द येथे शिक्षक गौरव सोहळा मोठ्या थाटामाटात सम्पन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नामदेवराव राऊत (शि वि अ बिट भं तळोधी) हे होते तर प्रमुख अतिथी श्री धनराज आवारी (गटशिक्षणाधिकारी पं स गोंडपीपरी), श्री सुनील मुत्यालवार (केंद्रप्रमुख विठ्ठलवाडा), श्री शंभूजी येलेकर (माजी प्राचार्य शिवाजी हायस्कुल विठ्ठलवाडा), श्री राजकुमार दुर्योधन (प्राचार्य शिवाजी हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय विठ्ठलवाडा), सौ रागिणी श्रीवास्तव जेष्ठ शिक्षिका कारमेल अकादमी तारसा खुर्द श्री टी आर महल्ले केंद्रप्रमुख चिमूर ( माजी केंद्रप्रमुख विठ्ठलवाडा) हे होते.सन 2019-20 व सन 2020-21 या कालावधीत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक गौरव करण्यात आला.

या बरोबरच श्री टी आर महल्ले केंद्रप्रमुख यांचा सपत्नीक निरोप समारंभ शिक्षण विभाग पं स गोंडपीपरी , सर्व शिक्षक बंधू भगिनी केंद्र विठ्ठलवाडा , मु अ तथा सर्व शिक्षक तारसा खुर्द,व कारमेल अकादमी तारसा खुर्द यांच्या वतीने करण्यात आला. सत्कार मूर्ती टी. आर. महल्ले यांनी मागील चार वर्षापासून विठ्ठल वाडा केंद्राला संपूर्ण जिल्ह्यात एका विशिष्ट उंचीवर नेले व टॉप 5 मध्ये केंद्राला स्थान मिळवून दिले. त्याचप्रमाणे एल आय पी समता समृद्धी कार्यक्रमांमध्ये केलेल्या कार्याबद्दल त्याच प्रकारे कोविंड 19 काळात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासनाने त्यांची दखल घेऊन त्यांची निवड कॉफी विथ सीईओ व यशो मंथन अंतर्गत त्यांची आनलाईन मुलाखत प्रसारित झालेली आहे.

त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विठ्ठल वाडा केंद्राबरोबरच संपूर्ण गोंडपिपरी पंचायत समिती गुणवत्तेत अग्रेसर राहण्याकरिता गट विकास अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत तालुक्‍यातील विविध शाळांना भेटी देऊन समुपदेशन तथा मार्गदर्शन केले.कोविड 19 काळात ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक उपक्रम शालास्तरावर श्री गौतम उराडे व श्री विठ्ठल गोंडे विषय शिक्षक जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा यांनी राबविले. त्यांच्या या कार्याची दखल जि प चंद्रपूर ने घेऊन त्यांना सन्मानपत्र व शिक्षण विभाग गोंडपीपरी च्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गौतम उराडे जिल्ह्य आदर्श शिक्षक तथा विषय शिक्षक विठ्ठलवाडा ,कार्यक्रमाचे सदाबहार संचलन श्री विठ्ठल गोंडे विषय शिक्षक विठ्ठलवाडा , श्री परमानंद इंदोरकर यांनी शिक्षक गौरव सोहळा एक स्तुत्य उपक्रम व महल्ले सरांच्या कार्याचा यथोचित लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे आभार जमनादास चांदेकर मु अ राळापेठ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्री रमेश भिले मु अ कोरम्बी यांनी व कारमेल अकादमी ची चमू यांनी कार्यक्रमाची सजावट करिता मोलाचे योगदान दिले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED