डाक विभागाच्या पाकिटावर झळकणार पैठणी

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिध,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.19सप्टेंबर):-येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी आता डाक विभागाच्या पाकिटावर दिसणार आहे जग भारत येथील पैठणीचे नाव आहे आता डाक विभागाच्या* पाकिटावर पैठणी दिसणार असल्यामुळे पैठणीला अधिक महत्व निर्माण झाले आहे पैठणीच्या निमित्ताने देशातील काना कोपऱ्यात येवल्याचे शहराचे नाव लौकीक होणार आहे.

येवला येथील पैठणी नागरिताच या पैठणी पदर असलेल्या डाक पाकिटाचे अनावरण अधीक्षक नितीन येवला, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, तसेच पैठणी विणकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

महाराष्ट्र सर्कल मध्येजी आय मानांकन प्राप्त होते आशा सर्व गोष्टीची डाक पाकिटावर झपाई केली जात असते त्यामुळे येवला येथील पैठणी संपूर्ण भारत भर डाक विभागाच्या स्पेशल कव्हर वर दिसणार आहे यावेळी डाक निरीक्षक राजेंद्र वानखेडे, डाक निरीक्षक पंकज दुसाने, पोस्ट मास्तर बी. आर. जाधव, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, पैठणी उत्पादक कृष्णा वडे, श्रीनिवास सोनी,तसेच पैठणीचे व्यापारी विणकर बांधव आदी सह उपस्तीत होते.*

Breaking News, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED