भैय्यासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य हे तमाम मानवतावादी कार्यकर्त्यांना आदर्शवत : कृष्णाजी सोनवणे यांचे प्रतिपादन

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.19सप्टेंबर):– महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य हे तमाम मानवतावादी कार्यकर्त्यांना आदर्शवत असून धम्म चळवळीतील त्यांचे योगदान मौलिक असून त्याच मार्गाने लोकमानसात धम्म रुजवावा, असे उदगार भारतीय महासभेचे केंद्रीय शिक्षक कृष्णाजी सोनवणे यांनी मुक्तीभूमी येवला येथे आयोजित यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृर्तीदीना निमित्त प्रतिमा अभिवादन कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.

भारतीय बौद्ध महासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक समिती,मुक्ती महत्सव समिती,मुक्तीभूमी येवला यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक समिती मुक्तीभूमी येवला संशोधन अधिकारी तथा व्यवस्थापक पल्लवी पगारे यांच्या हस्ते प्रतिमा अभिवादन करण्यात आले.

निमंत्रक शरद शेजवळ यांनी केले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश खळे, वाचनालय व महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ, कृष्णाजी सोनवणे, भगवान साबळे,वंदनाताई सोनवणे,बौद्धाचार्य पंचम साळवे, गौरव साबळे,समाधान गरुड,सागर साळवे,अशोक केदारे,आकाश अहिरे, महिंद्र हिरे, दादासाहेब निकम, सिद्धार्थ हिरे,(सुपरवायझर) अनिता चंदनशिवे, नंदाबाई साठे आदि नागरिक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED