दिवाणी व फौजदारी न्यायालय धरणगाव व तालुका वकील संघ धरणगाव यांच्या तर्फे कल्याणेहोळ येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन

✒️ धरणगाव प्रतिनिधी(पी. डी. पाटील सर)

धरणगाव(दि.19सप्टेंबर):- धरणगांव तालुक्यातील कल्याणेहोळ येथे धरणगाव येथील दिवाणी फौजदारी न्यायालय व धरणगाव वकील संघातर्फे दिनांक १७ सप्टेंबर, २०२१ रोजी कायदेविषयक शिबिराचे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर व कल्याणेहोळ गावचे लोकनियुक्त सरपंच रमेश राजाराम पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली..

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड. बी. के. आवारे हे होते. कायदेविषयक शिबिरात धरणगाव वकील संघाचे ऍड. राजेंद्र येवले यांनी मोटार अपघाताबाबत कायदेशीर योग्य अशी माहिती दिली तसेच मोटर सायकल चालवताना हेल्मेट घातले कायद्याने बंधनकारक आहे. तसेच चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. जेणेकरून अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळणे सोपे होते. तसेच मोटर सायकल फोर व्हीलर चालवताना ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक असते इत्यादी माहिती दिली त्यानंतर ऍड. गजानन पाटील यांनी महसूल कायद्याबाबत योग्य अशी माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना आपल्या बांधापर्यंत जाणे साठी रस्ता देणे प्रत्येकाला कायद्याने बंधनकारक आहे. याबाबत सुद्धा माहिती दिली तसेच महिलांबाबत सुद्धा महिलांना असलेल्या कायदेशीर अधिकाराबाबत माहिती दिली जसे की आपल्या पतीला किती पगार मिळतो ? याबाबत माहिती मिळण्याचा अधिकार आहे. तसेच महिलांवर अत्याचार झाल्यास कशा पद्धतीने कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा याबाबत सुद्धा कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन केले.

त्यानंतर कल्याणे होळ गावचे नवनियुक्त सरपंच रमेश बापू पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले की आमच्या गावामध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन केल्यामुळे आमच्या गावातील ग्रामस्थांना विविध कायद्यांचे ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे भविष्यात अडचण आल्यास ग्रामस्थांना याबाबत निश्चितच लाभ होईल. तसेच आमच्या गावातील प्रत्येक वाद आपसात सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो पण निर्माण झालेला वाद गावाचे पोलीस पाटील भिका आप्पा पाटील व ग्रामस्थ मंडळी चर्चा होऊन वाद सोडण्यात येतो. त्यामुळे वेळ व पैशांची बचत होते व कटुता निर्माण होत नाही.

त्यानंतर अध्यक्षीय मनोगत धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एस.डी सावरकर यांनी कायदेविषयक शिबिराला मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त केले की गावातील वाद निर्माण झाल्यानंतर सामंजस्याने सोडल्यास निश्चितच गावात शांतता राखण्यास मदत होते तसेच वेळेची व पैशांची बचत होते. तसेच निर्माण झालेला वाद सकारात्मक पद्धतीने सोडला तर निश्चितच वाद मिटत असतो तसेच सध्या महिलांसाठी करण्यात आलेला कायदा कलम 498 बाबत फार मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात येतो जसे की पतीच्या ज्या नातेवाईकांचा झालेल्या घटनेबाबत कोणताही संबंध नसतो अशा नातेवाईकांची नावे विवाहित पत्नी कडून फौजदारी गुन्हा दाखल करताना दाखल करण्यात येतात.

त्यामुळे निरपराध लोकांना या कायद्याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो ज्यांनी खरंच विवाहितेला त्रास दिला असेल त्यांचे नाव फिर्यादी मध्ये नमूद केल्यास विवाहितेला निश्चित न्याय मिळण्यास मदत होईल तसेच घर बांधकाम करताना तसेच इतर अनेक वाद निर्माण झाल्यावर शेजाऱ्यांनी आपसात चर्चा करून निर्माण झालेला वाद तर निश्चितच त्याचा फायदा दोघांनाही होत असतो. परंतु बऱ्याचदा आपसात वाद न सुटल्यास कोर्टामार्फत मात्र वाद सोडण्यास निश्चित मदत होत असते तसेच इतर अनेक कायद्यांबाबत न्यायाधीश सावरकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने हजर होत्या तसेच गावचे पोलीस पाटील भिका अप्पा पाटील तसेच धरणगाव वकील संघाचे ऍड. सी झेड कटारे, एडवोकेट व्ही.एस.भोलाने, एडवोकेट महेंद्र चौधरी, एडवोकेट डी. ए. माळी, एडवोकेट अजय बडगुजर, एडवोकेट संदीप सुतारे, एडवोकेट हरिहर पाटील, एडवोकेट रिषभ शुक्ला, एडवोकेट रामभाऊ शिंदे, हजर होते .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बापू पाटील तसेच भिका पाटील तसेच ग्रामसेवक महाजन तसेच धरणगाव न्यायालयाचे न्यायालयीन वरिष्ठ लिपिक श्री. सैंदाणे भाऊसाहेब व श्री. गणेश चौधरी भाऊसाहेब यांनी परिश्रम घेतले व आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम धरणगाव वकील संघाचे एडवोकेट गजानन पाटील यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED