अभिष्टचिंतन सोहळानिमित्त शहरातील सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सन्मान !

27

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.19सप्टेंबर):- धरणगाव शहरातील जय बजरंग व्यायाम शाळा व हनुमान नगर मित्र मंडळ यांच्यातर्फे कन्हैया महाजन यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

कन्हैया महाजन यांनी आपला जन्मदिवस एक सामाजिक संदेश देऊन साजरा केला.

या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा दादा महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, ज्ञानेश्वर भादू महाजन, महामंडलेश्वर ह.भ.प.भगवान बाबा, ता.अ.पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष एड.वसंतराव भोलाणे, न.पा.चे नगरसेवक कैलास माळी सर, ललित येवले, अजय चव्हाण, माळी समाजाचे पंच विजय महाजन, दै.सामनाचे पत्रकार बाळासाहेब जाधव, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लाक्ष्मण पाटील, गुलाब मराठे शिवाजी पाटील दयाराम मराठे, कौतिक पवार, जयसिंग मराठे, दशरथ भोई आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व सन्माननीय प्रमुख अतिथी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची खरी देवता – सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित समारंभाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सं.सा.मा.स.सु.पंच मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, तालुका अधिकृत पत्रकार संघाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष ऍड.वसंतराव भोलाणे, ओ.बी.सी.मोर्चा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य व माळी समाज पंच मंडळाचे सल्लागार पंच म्हणून आबासाहेब राजेंद्र वाघ यांची निवड झाली, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक ऐनुद्दीन शेख सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून, महात्मा फुले हायस्कूल धरणगाव चे उपक्रमशील शिक्षक पी डी पाटील यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व माळी समाज पंच मंडळाचे सल्लागार पंच म्हणून निवड झाली म्हणुन, सा.दा.कुडे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एस. एल. सूर्यवंशी यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, अनोरे विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक बीआर महाजन यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, बाळासाहेब जाधव यांची कैकाडी समाज युवक आघाडी जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, माहितीचा अधिकार तालुका संघटक पदी प्रभाकर ठाकूर साहेब यांची निवड झाली म्हणुन, माळी समाजाचे नवनियुक्त उपाध्यक्ष – निंबाजी सदु माळी, माळी समाजाचे नवनियुक्त कोषाध्यक्ष – व्ही.टी.माळी सर, माळी समाजाचे नवनियुक्त सचिव – गोपाल भास्कर माळी, माळी समाजाचे सल्लागार पंच हेमंत माळी, विनायक महाजन, या सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्ष व प्रमुख अतिथी व सत्कार मूर्ती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कन्हैया महाजन यांचा जन्मदिवस केक कापून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्व मान्यवरांनी मनोगतात कन्हैया ला खूप खूप शुभेच्छा दिल्या व पुढील सामाजिक कार्यासाठी आशिर्वाद दिला.
या अभिष्टचिंतन सोहळ्याचे सूत्रसंचलन योगेश महाजन, पी.डी.पाटील तर आभार गुलाब मराठे यांनी मानले. अभिष्टचिंतन सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी दिपकराव मराठे व मित्र परिवार तसेच, हनुमान नगर मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ यांनी अनमोल सहकार्य केले व परिश्रम घेतले.