उमरखेड येथिल बौद्ध स्मशानभूमी व डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड च्या विविध मागण्या पूर्ण करा- सिध्दार्थ दिवेकर

30

🔸मा. रामदास आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री) यांना निवेदन सादर

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.18सप्टेंबर):-सप्टेंबर रोजी शहरामध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन सोहळ्यासाठी मा. रामदास आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार) हे आले होते.

उद्घाटन करून त्यांचा सत्काराचा कार्यक्रम राजस्थानी भवन येथे सुरू असतांना सिध्दार्थ दिवेकर (अध्यक्ष बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समिती उमरखेड) यांनी माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना स्टेजवर जाऊन निवेदन दिले.

निवेदनामध्ये बौद्ध समशानभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील विविध सामाजिक व सार्वजनिक मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

1) बौद्ध स्मशानभूमी मधील स्टेडियम बैठक व्यवस्था पायऱ्यावर फरशी बसविणे,

2) बौद्ध स्मशानभूमीमध्ये एक सरणी जाळी बसविणे,

3) बौद्ध समशानभूमी मधील सिमेंट रोड मधील सिमेंट रोड हा निकृष्ट दर्जाचा बनविला आहे तो पुन्हा नवीन तयार करण्यात यावा,

4) बौद्ध स्मशानभूमी मध्ये दोन एलईडी लाईट बसविणे,

5) बौद्ध समशानभूमीच्या बर्निंग शेड समोर चेकर्स बसवणे,

6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सार्वजनिक वाचनालय झाल्यामुळे ते पाडून नवीन वाचनालय आणि ग्रंथालय बांधून देण्यात यावी,

7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील नाल्यांचे नूतनीकरण करण्यात यावी,

8) नगरसेवक सर यांच्या घरामागील नाली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड सार्वजनिक स्वच्छता पर्यंत नाली बांधून देण्यात यावी.

9) डॉ. आंबेडकर वार्ड मधील सर्वच सिमेंट रोडवर चेकर्स बसविण्यात यावे.

अशा प्रकारचे निवेदन माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देण्यात आले व त्यांनी लगेच नगराध्यक्ष नामदेव ससाने यांच्याकडे सुपूर्त केले. आणि ह्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश देण्यात आले.

यावेळी निवेदनकर्ते सिध्दार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर, प्रफुल दिवेकर उपस्थित होते.