रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्ष पदी बापुराज खरे

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.19सप्टेंबर): – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जेष्ठ नेते व ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे उपसरपंच श्री. बापुराज तुळशीराम खरे यांची रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाप्रमुख .प्रकाशजी लोंढे यांनी नाशिक येथील पक्षाच्या कार्यालयात बापुराज खरे यांना पुष्पगुच्छ व नाशिक जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम प्रसंगी जिल्हाप्रमुख .प्रकाशजी लोंढे ,पक्षाचे राज्यस्तरीय नेते .शंकरराव काकळीज ,नाशिक शहर महिला आघाडी प्रमुख श्रीमती मनाली जाधव, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष बापू मोरे , माजी उपसरपंच विश्वास खरे,जेष्ठ नेते समाधान जगताप , संजय पवार, रमेश व्यापार ,सुनील अहिरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED