निस्वार्थ आदीवासी संस्थेच्या वतीने कामगारांसाठी राबवण्यात आली श्रमिक कार्ड योजना

29

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(संजय कोळी)

न्याहळोद(दि.19सप्टेंबर):- येथे निस्वार्थ आदीवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेञातील कामगारांसाठी श्रमिक कार्ड योजना राबवण्यात आली गावातील अंसख्य कामगारांनी या उपक्रमात सहभाग घेऊन सदर योजनेचा लाभ घेतला.या उपक्रमासाठी कॉम्पुटर अॉपरेटर छोटु साळुंखे यांचे सहकार्य लाभले.

निस्वार्थ आदीवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश काकुळदे यांनी कॉम्पुटर अॉपरेटर छोटु साळुंखे यांचे नारळ देऊन सत्कार केला तसेच कार्यक्रमाला विलास शिरसाठ सर,विजय सावळे,नगराज ईशी,राहुल सुर्यवंशी,योगेश कोळी,प्रविण कोळी,भटु धनगर,कैलास कोळी,विठ्ठल लोहार उपस्तीथ होते.

कार्यक्रमाचे आयोजन निस्वार्थ आदीवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज कोळी,उपाध्यक्ष नितीन कोळी,सचिव डॉ.सुरेश काकुळदे,खजिनदार दिव्या कोळी,सदस्य ललीता शिरसाठ,सदस्य दिपाली मोरे,सदस्य चेतना कोळी यांनी आयोजन केले.