महाराष्ट्राचे मंत्री सुनील केदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी

🔹महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती विभागाचे सदस्य व सातारा जिल्हा प्रभारी विजयकुमार भास्कर भोसले यांचे सोनिया गांधी यांना निवेदन

✒️कुंभोज(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कुंभोज(दि.19सप्टेंबर):- हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती विभागाचे सदस्य व सातारा जिल्हा प्रभारी विजयकुमार भास्कर भोसले यांनी सोनिया गांधी अध्यक्षा अखिल भारतीय काँग्रेस समिती नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मंत्री सुनील केदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत हे महाराष्ट्राचे प्रतिभावान दलित चेहरा आहे. ते पूर्ण भारतीय स्तरावर अनुसूचित जातीचे संघटन व संघटनात्मक कार्य पूर्ण जोमाने सांभाळतात. महाराष्ट्रासह देशभरातील दलित यांच्या कार्याने अभिमान भरतात. त्यांना दलितरत्न म्हणून ओळखतात.

अत्यंत खेदपूर्वक सांगावे वाटते की, महाराष्ट्राचे मंत्री सुनील केदार ते प्रत्येक वेळी नितीन राऊत यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यात स्वतःचा एक वेगळा गट तयार करून गटबाजी करतात व आपल्या गटातील कार्यकर्त्यांना नितीन राऊत यांच्या विरुद्ध भडकवतात. सुनील केदार यांच्याकडील खात्यासंदर्भात समाजातील नागपुर मधील पशुचिकित्सा भवनच्या उद्घाटन समारंभ पत्रिकेमध्ये जिल्ह्याचे प्रथम नागरिक नितीन राऊत यांचे नाव नाही उलट नागपूर मधील इतर पार्टीच्या नेत्यांची नावे आहेत.

काँग्रेस पार्टीमध्ये आतापर्यंत चालत आलेल्या जातीवादीचा चेहरा समोर आणला आहे असे मला वाटत आहे. एका दलित मंत्री यांना महाराष्ट्रात का त्रास दिला जातो . संघ आणि भाजपच्या जातीय वादाचा आम्ही विरोध करतो परंतु काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा संघाच्या विचाराचे पालन होत आहे ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी व सुनील केदार यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED