लकवाग्रस्त हरी शेंडेला लोकसहभागातून मदतीचा आधार

25

🔸शेतकरी संघटनेचा पुढाकार

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.20सप्टेंबर):-मोडकळीस आलेले घर, दोन मुली व पत्नीची जबाबदारी असलेल्या गडचांदूर येथील हरी शेंडे (वय ५५ वर्षे) यांना नुकतेच लकवा आजाराने ग्रासले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने औषधोपचार व वैद्यकीय तपासणीत अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान हरी शेंडे यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून शेतकरी संघटनेच्या माध्यमाने लोकसहभागातून निधी गोळा करण्यात आला. सदरची रक्कम हरी शेंडे यांच्या कुटुंबीयांना श्री. प्रविणजी गुंडावार, ॲड. दीपक चटप, संतोषभाऊ पटकोटवार, नागोजी गोवारदिपे यांनी सुपूर्त केली.

गडचांदूर येथील श्री. विलास धांडे, श्री. प्रविणजी गुंडावार, ॲड. दीपक चटप, संतोषभाऊ पटकोटवार, ख्वाजाभाई, मुमताज भाई, वासुदेव गौरकार, दिलीप आस्वले, प्रवीण एकरे, मनोहर सातपुते, गुणवंत खोके, नागोबाजी गोवारदिपे, डॉ. के.आर. भोयर, डॉ. जयदीप चटप, शैलेश विरुटकर, महादेव नागभिडकर, ज्ञानेश्वर अवताडे आदींनी आर्थिक सहकार्य केले.