राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमा मध्ये तालुक्यातील एक ही पदाधिकारी नव्हते उपस्थित

🔸जिवती तालुक्यात गटबाजीची चर्चेला उधाण- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार परिणाम

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.20सप्टेंबर):- राजुरा विधानसभा मतदारसंघातील जिवती तालुक्यातील शेणगांव येथे आंबेडकर भवन मध्ये दि. १८ सप्तेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण भाऊ निमजे होते प्रमुख पाहुणे म्हणून रफीक भाई निजामी चंद्रपूर जिल्हा महासचिव आणि शरद जोगी कोरपना तालुका अध्यक्ष तथा गडचांदुर नगर परिषदेचे उपाध्यक्ष उपस्थित होते.

यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला परंतु या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमा मध्ये जिवती तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एकही पदाधिकारी उपस्थित नव्हते या वरुन जिवती तालुक्यातील इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि जानकर लोकांन मध्ये खंमग चर्चा आहे की राष्ट्रवादी पक्षा मध्ये गटबाजी तर नाहीना अशी चर्चा तालुक्यात ऐकायला मिळाली? भविष्यात होणाऱ्या निवडणुका जिवती नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, संस्था ( सोसायटी ), ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकीवर खरोखरच पक्षात गटबाजी असणार तर होणाऱ्या निवडणुकीवर परिणाम होण्याचे चिन्ह दिसत आहे अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति
©️ALL RIGHT RESERVED