बहुजन समाज पार्टी तर्फे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

31

🔹समतामुलक समाज बनविणे गरजेचे – गणपत तावाडे

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.20सप्टेंबर):-बहुजन समाज पार्टीच्या वतीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा येथे परिवर्तन भवनात *विधानसभा अध्यक्ष मा. खुशाल भाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वात* दिनांक 19/09/2021 रोजी एक दिवसीय *तालुका स्तरीय कार्यशाळा (कॅडर)* आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन *जिल्हाध्यक्ष मा. शंकर बोरकुट बसपा गडचिरोली* यांच्या हस्ते करण्यात आले. *प्रमुख मार्गदर्शक मा. गणपत तावडे साहेब जिल्हा प्रभारी गडचिरोली* प्रामुख्याने उपस्थित होते.गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात अनेक आदिवासींच्या व इतर प्रवर्गाच्या समस्या आहेत. आदिवासींसाठी शिक्षणाच्या सोयी सुविधा या क्षेत्रात अत्यंत कमकुवत दर्जाचे असून सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक धोरणामुळे पुढील पिढीचे आयुष्य अंधारात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्र घनदाट जंगलाने व्यापलेला आहे या ठिकाणी अतिशय गंभीर स्वरूपाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अहेरी ते सिरोंचा रोडाची अवस्था दैनिय स्थितीत असून अधिकारी वर्ग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

जनतेनेही याबाबत जागृत असणे गरजेचे आहे. बहुजन समाजाला न्याय मिळवुन घेण्यासाठी एकसंघ होणे एकमात्र पर्याय असून मोठ्या प्रमाणात आदिवासी युवकांनी पुढाकार घेऊन समाज जागृती करावी.बहुजन समाजाची एकमेव राष्ट्रीय पार्टी बहुजन समाज पार्टी असून बहुजन समाजाला समतामुलक समाज बनविणे गरजेचे आहे. याबाबत कानाकोपऱ्यात पार्टीचे ध्येय उद्दिष्ट्ये पोहचविण्याचे काम युवकांनी संघटित होऊन करावे.असे प्रतिपादन कार्यक्रमादरम्यान माननीय गणपत तावडे यांनी केले.कार्यक्रमादरम्यान मा. शंकर अलोने जिल्हा सचिव, मा. हेमंत कुळसंगे उपाध्यक्ष वि.स.क्षे अहेरी, मा.रमेश उईके साहेब महासचिव वि.स.क्षे अहेरी, नारायण अलोने कोष्याध्यक्ष वि.स.क्षेअहेरी,कैलास कोंडागुरले बीवीएफ जिल्हा संयोजक, रमेश गावडे तालुका अध्यक्ष, सत्यम कुंमरी विधानसभा सचिव, सादिक शेख शहराध्यक्ष सिरोंचा, आदी पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या क्षेत्रातील अनेक शेतकरी आर्थिक स्थितीमुळे संकटामध्ये अडकलेला असून त्याची आर्थिक सुधारणा होण्यासाठी शासनाच्या अनेक योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आदिवासी दलित व मागास प्रवर्गाची आर्थिक स्थिती बिकट असून विधानसभा क्षेत्रात कोणतेही मोठे उद्योग नसल्यामुळे या क्षेत्रातील अनेक कुटुंबे उदर निर्वाहासाठी लगतच्या राज्यांमध्ये मजुरी करण्यास जात असतात. या क्षेत्रात जंगल व खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असून यावर अनेक उद्योग उभारले जाऊ शकतात व बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतो . परंतु जिल्ह्यात उदासीन असलेले अधिकारी व कर्मचारी, भ्रष्टाचाराचे वाढते प्रमाण, दारू बंद असून मोठ्या संख्येत युवकांवर्ग दारूच्या आहारी गेला आहे. कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नसल्याने या क्षेत्रात विकास खंडित झाला आहे.यांच्यामुळे जिल्हा आज अधोगतीला गेलेला दिसतो. बहुजनांना शासनकर्ती जमात बनणे आजच्या काळाची गरज आहे. असे मत मा.शंकर बोरकुट यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी झिंगाणुर सेक्टर अंतर्गत आनंदराव कोंडागुर्ले- विधानसभा सचिव, सचिन मडावी सेक्टर अध्यक्ष, रमेश कोंडागुर्ले उपाध्यक्ष, जगदीश कुमरी महासचिव, राजेश कूमरी कोष्याध्यक्ष यांची या पदांवर नियुक्ती करण्यात आली.कार्यशाळेस सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागातून अनेक कार्यकर्त्यांनी व आजी माजी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली.कार्यक्रमाचे संचालन- ॲड. अनंत रेड्डी पोट्टाला* यांनी केले. व *उपस्थितांचे आभार मा. रामचंद्र दुर्गम* यांनी व्यक्त केले.