समस्त पाटील समाज मढी लहान माळी वाडा धरणगाव येथे भाद्रपद सप्ताह उत्साहात संपन्न

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी. पाटील सर)

धरणगांव(दि.20सप्टेंबर):- सालाबादप्रमाणे चालत येणारा अखंड हरीनाम भाद्रपद सप्ताह गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा काळात अतिशय साध्या पद्धतीने संपन्न होत होता, परंतु यंदा कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होता म्हणून समस्त पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ लहान माळी वाडा , धरणगाव आयोजित भाद्रपद सप्ताहाची सांगता दि.18 सप्टेंबर रोजी झाली. कै. तात्यासो रावा दगा पाटील , कै. ताईसो गयाबाई रावा पाटील व कै.नानासो ह. भ. प.प्रा. प्रल्हाद बाबुराव पाटील (अनोरेकर )यांच्या स्मरणार्थ सौ. रेशमाबाई भास्कर पाटील , सौ. सुशिलाबाई रामकृष्ण पाटील , श्रीमती.वत्सलाबाई दामू पाटील व श्रीमती हिराबाई प्रल्हाद पाटील यांचेकडून या सप्ताहाला आर्थिक स्वरूपात देणगी देऊन या चारही बहिणींनी आज समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दिला. परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.अतिशय भक्तिमय व सुंदर वातावरणात महाप्रसादाची पंगत संपन्न झाल्यानंतर रात्री ह. भ. प. कनैय्या महाराज शेंदुर्णीकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.

त्यानंतर दा्तृत्व व्यक्ती विषयी कृतज्ञता म्हणून एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दातृत्ववान व्यक्तित्व , कीर्तनकार महाराज , कीर्तन सेवेला सहकार्य करणारे भजनी मंडळी, मृदंगचार्य, विणेकरी इ.विविध मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ लहान माळी वाडा, समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा व इतर समाज बांधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील , यांनी तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED