नेर येथील मंडळांनी दिला गणरायाला शेवटचा निरोप

28

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

धुळे(दि.20सप्टेंबर):- तालुक्यातील नेर येथील गणेश मित्र मंडळांनी आज अनंत चतुर्थी निमित्त सगळे मंडळ गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले होते.तसेच नेर गावातून मोठे मित्र मंडळानीं नियमांची काटेकोर पालन करून कोणताहि वाजा-गाजा न लावता विसर्जनासाठी गणपती बाप्पाना घेउन गेलेत.तसेच सर्व मंडळांनी आपआपल्या गणपती जवळ जागेवर साऊंड सिस्टीम लाऊन मोठा जल्लोष केला व विसर्जनासाठी आक्कलपाडा धरणावर घेऊन विसर्जन केले.तसेच पुढल्‍या वर्षी लवकर या..बाप्‍पाला भावपुर्ण निरोप दिला.गणरायाला निरोप देण्याचा आज दिवस असून सकाळपासूनच गणेशाच्या विसर्जनाला आक्कलपाडा धरणावर सुरवात झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया..पुढल्या वर्षी लवकर या..’ असे म्हणत निरोप देण्यात आला.

आज गणेश विसर्जन असून कोरोनाचे सर्व नियम पाळून विसर्जनाला सकाळपासूनच सुरवात झाली. नेर येथील पांझरा नदीवर लहान मोठ्या मंडलासह घराघरातील गणराजाचे विसर्जन हे मोठ्या पुला जवळ करण्यात आले होते. तसेच मोठे मंडळाचे गणपती हे अक्कलपाडा धरणात होत आहे. याठिकाणी विसर्जनाची पूर्ण तयारी करण्यात अली असून विसर्जनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लहान मंडळाच्या गणेश विसर्जनला सूरवात झाली असुन मोठ्या मंडळाचे गणपती देखील या ठिकाणी विसर्जित केले जाणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षी लवकर या ..’ असा गणपतीचा जयजयकार करत गणपती बाप्पाला निरोप देत आहे.

तसेच नेर गावात विसर्जन मिरवणूक काढण्याकरिता पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आलेला होता. नागरिकांनी शांततेत विसर्जन करावं असे आव्हान जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी केले होते. यावेळी नेर गावातील मित्र मंडळ बजरंग मित्र मंडळ,न्यू महात्मा फुले मित्र मंडळ, राजे ग्रुप मंडळ, भवानी मित्र मंडळ, महात्मा फुले विजय व्यायम शाळा मित्र मंडळ,रॉयल मित्र मंडळ, श्रद्धा मित्र मंडळ असे सर्व मित्र मंडळानी सायंकाळी विसर्जनासाठी सज्ज झाले होते.