चंद्रपूर जिल्ह्यात (दि.20सप्टेंबर) रोजी सोमवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 2 कोरोना पॉझिटिव्ह

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20सप्टेंबर):- गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 2 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 1, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 705 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 135 झाली आहे. सध्या 30 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 90 हजार 668 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 696 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

🔺आज गडचिरोली जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या निरंक, 1 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.20सप्टेंबर):-आज गडचिरोली जिल्हयात 376 कोरोना तपासण्यांपैकी नविन कोरोना बाधितांची संख्या निरंक असून 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30760 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29997 आहे. तसेच सद्या 17 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.52 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.06 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

कोरोनामुक्त झालेल्या मध्ये धानोरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.