कोरोना काळात जीव धोक्यात घालून माणुसकीचा धर्म पाळणा-या कर्मचाऱ्यांचा सन्मान काळाची गरज – राजेंद्र झाडे

28

🔹शिक्षक भारती मूल तर्फे कोविड योद्धांचा सन्मान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20सप्टेंबर):- कोविड महामारीत जीवावर उदार होऊन अनेक कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे जीव वाचवले.कोविड सेंटरवर सेवा दिली.सर्वेक्षणात मोलाची भूमिका बजावली.रक्तदानासारख्या पवित्र कार्यात अनेक कर्मचाऱ्यांनी रक्त दिले.माणुसकीचा धर्म पाळून अनेकांना मदतीचा हात दिला.माणुसकीच्या कार्यात झोकून देऊन कार्य करणा-या माणुसकीच्या दूतांचा सत्कार हा अतिशय भावपूर्ण सोहळा असल्याचे प्रतिपादन शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे यांनी केले.शिक्षक भारती परिवार मूलच्या वतीने पंचायत समिती सभागृहात कोरोना काळात कोविड सेंटर येथे कार्य करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार यांनी केले.अध्यक्षस्थानी शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, शिक्षक भारतीचे राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर,विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,माध्यमिक जिल्हा अध्यक्ष भास्कर बावणकर,विशेष शाळा विभागाचे जिल्हाध्यक्ष महेश भगत,गडचिरोली जिल्हा पुंडलिक देशमुख, पुरूषोत्तम टोंगे,केंद्रप्रमुख गजेंद्र कोपूलवार,मुख्याध्यापक धनराज रडके,अशोक वारजुकर,रमेश दांडेकर,रावन शेरकुरे,विलास फलके,अमरदिप भुरले आदी उपस्थित होते.सभापती चंदू मारगोनवार,भाऊराव पत्रे,संजय खेडीकर,महेश भगत,भास्कर बावनकर,पुरुषोत्तम टोंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोविड योद्धा म्हणून कार्य केलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी, पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी, आशा वर्कर, विशेष शाळातील शिक्षक कर्मचारी, मूल पंचायत समितीतील जि.प.प्राथमिक शिक्षक व शिक्षिका, कर्मवीर महाविद्यालय मूल येथील शिक्षक आणि नवभारत विद्यालय येथील शिक्षक व शिक्षिकांचा सन्मानपत्र,पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन अतिथींचे हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी यांनी केले.प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांनी केले.आभार तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, मुल तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे, विशेष शाळाचे डॉ.तागडे, माध्यमिकचे रुषि मुंडरे,प्राथमिक तालुका सचिव छबन कन्नाके,कोषाध्यक्ष कुमदेव कुळमेथे,संघटक विजय मडावी,सावली तालुका अध्यक्ष किसन गेडाम, प्रसिद्धी प्रमुख विजय मिटपल्लीवार, विनोद धानोरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.