सुमेधबोद्धी विहाराच्या विकास कामासाठी १ कोटी देणार- ना. रामदास आठवले

25

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.२०सप्टेंबर):-येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले आले असता त्यांनी लोकवर्गणीतून निर्माण झालेल्या भव्यदिव्य अशा सुमोध बौद्धी विहाराला भेट दिली असता तेथील कार्य पाहून त्यांनी विहाराच्या विकास कामासाठी १ कोटी रुपयाचा निधी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विहार समितीचे अध्यक्ष प्रो. डॉ. अनिल काळबांडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार नामदेव ससाने,रिपाईचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मानकर , माजी आमदार विजय खडसे , पं.स. सभापती प्रज्ञानंद खडसे , धम्मानंद नरवाडे, विरेंद्र खंदारे, राहूल काळबांडे उपस्थित होते . प्रथम भदन्त डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी उपस्थितांना पंचशिल सह त्रिशरण प्रदान केले.

पुढे बोलतांना आठवले म्हणाले की, विहाराच्या वरील बांधकामासाठी ज्यामध्ये अभ्यासिका, वाचनालय , विप्पसना ध्यान केंद्र यासाठी हे १ कोटी सपये खर्च केल्या जातील.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गजानन दामोधर तर आभार संतोष नितळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी विहार समितीचे सचीव भिमराव सोनुले, उत्तम शिंगणकर , सुभाष वाठोरे , साहेबराव कांबळे यांनी सहकार्य केले.