नाशिक द्वारका परिसरातील घटनेचा उलगडा- खून नसल्याचे आले समोर !

28

🔺चोरी करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू!

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.20सप्टेंबर):- द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस भागात पहाटे खून झाल्याची घटनेची चर्चा होती पण मयत हा चोरी करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचे समोर आले आहे त्याच्या साथीदारांनी औषधोपचारासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ते रिक्षाची बराच वेळ वाट बघत होते पण रिक्षा न मिळाल्याने साथीदार निघून गेले त्यानंतर त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदू उर्फ भोला सामा रहासे राहणार मांडवी खुर्द नंदुरबार असे मुहूर्त तरुणाचे नाव आहे चंदू रहासे दिनांक 20 पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टर हाऊस जवळ नवीन बांधकाम सुरू असलेल्या स्टार लाईन या इमारतीवर लोखंडी सळई चोरी करण्यासाठी गेला होता चोरी करीत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तो जमिनीवर कोसळला होता या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती अन्य साथीदारांनी त्याला काही अंतरावरील महामार्गावर आणून उपचारार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच रिक्षा न मिळाल्याने भीतीपोटी ते पसार झाले गंभीर अवस्थेत भोलाने अमृत विनायक बिल्डींग समोरील महामार्गाच्या जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो उड्डाणपुलाखालील पोल नंबर 73 ते 75 दरम्यानच्या झाडाझुडपात पडला अतिरिक्त रक्तस्त्राव मुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना आज सकाळी उघडकीस आली शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी भद्रकाली पोलिस स्टेशनला माहिती दिली पेट्रोलिंग वर असलेल्या उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या पाठोपाठ वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार दिलीप ठाकूर सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते शिवाजी अहिरे संजय बिडकर उपनिरीक्षक जितेंद्र माळी विलास मुंडे भास्कर गवळी आदीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली प्रथम दर्शनी खुनाच्या संशयावरून शोध सुरू केला शितलादेवी मंदिर परिसर राहणाऱ्या मृताच्या मित्रास गाठून अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ताली पोलीस तपासातून चोरीचा हा प्रकार समोर आला असून मृताच्या साथीदारांची चौकशी सुरू आहे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड अमोल तांबे सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना नवनाथ तांबे आधी च्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे