रासेयोचा राष्ट्रीय पुरस्कारःसपना सुरेश बाबर उत्कृष्ट स्वयंसेविका

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.21सप्टेंबर):-येथील लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल (एल.आर.टी.) महाविद्यालयाची विद्यार्थिनी सपना सुरेश बाबर हिला राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे तिचे लोकशाही सभागृहात अभिनंदन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार वसो, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने, डॉ. सुनिल मानकर, डॉ. स्वप्निल माहोरे, डॉ. मीनल पवार, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मीना शिवाल, डॉ. व्ही.टी.सोनोने, डॉ. श्वेता वानखडे, डॉ. सैय्यद इशरत, ॲड. शुभांगी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED