कृष्ण गीता नगर येथे कॉलनीच्या फलकाचे अनावरण

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.२१ सप्टेंब):; मंगळवार रोजी धरणगाव नगर परिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर गट नंबर ५४६ मध्ये कॉलनीच्या फलकाचे अनावरण शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख – मा. गुलाबरावजी वाघसाहेब , धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष – आबासाहेब निलेश चौधरी व धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष बापुसाहेब ऍड. व्ही.एस.भोलाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलनीवासी जे. एस.पवार सर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचे सह संपर्क प्रमुख – गुलाबरावजी वाघ साहेब होते. प्रमुख अतिथी धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष – आबासाहेब निलेश चौधरी, तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड. वसंतराव भोलाणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख – पी.एम. पाटील सर, नगरसेवक किरण मराठे, तालुका अधिकृत पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य जितेंद्र महाजन, कमलाकर पाटील उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कृष्ण गीता नगर कॉलनीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कॉलनी वासियं तर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.

कृष्ण गीता नगर कॉलनीवासी एस.एन.कोळी महेंद्र सैनी, बी.एम.सैंदाणे यांनी उपस्थित मान्यवरांना कॉलनीतील विविध समस्या सांगितल्या.

धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष बाबासाहेब निलेश चौधरी यांनी कृष्ण गीता नगर कॉलनीतील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यानंतर तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब ऍड.वसंतराव भोलाणे यांनी कॉलनीतील समस्या ऐकून माझ्याने जेवढी शक्य आहे तेवढी मदत मी करायला तयार आहे त्यांनी तात्काळ पोलवरील लोखंडी क्लॅम मी बसवून देतो असे प्रतिपादन केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर यांनी कृष्ण गीता नगर व इतर कॉलनीतील रस्ता मंजूर झालेला आहे. त्याची मंजुरी लवकरच मिळणार आहे. तो वर्षभरात पक्का रस्ता होईल असे कॉलनी वासियांना सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबरावजी वाघ साहेब यांनी तात्काळ त्या कच्च्या रस्त्यावर ५ ते ७ डंफर मुरूम टाकण्याचे आश्‍वासन दिले. लवकरात लवकर तो रस्ता सुरळीत होईल आणि कॉलनीतील छोट्या-मोठ्या समस्या लवकरच दूर होतील असे कॉलनी वासियांना सांगितले.
या छोटेखानी उद्घाटन समारोहाप्रसंगी धरणगाव नगरीचे सर्व सन्माननीय नगरसेवक व धरणगाव शहरातील व ग्रामीण भागातील सर्व सन्माननीय पत्रकार बांधव , प्रेस रिपोर्टर, याप्रसंगी कॉलनीचे ज्येष्ठ नागरिक विनायक सोनूजी न्हावी, बी.एम.सैंदाणे, प्रल्हाद विसपुते, जे.एस. पवार, महेंद्र सैनी, गोकुळ महाजन, बाळू अत्तरदे , संजय सुतार , एस.एन. कोळी, ज्ञानदेव पवार, महाजन काका, सुधाकर मोरे , व्ही.एस.कायंदे सर, ज्ञानेश्वर पवार, योगेश पवार, पी.डी.पाटील उपस्थित होते. तसेच जी.एस.नगर, शांती विजयनगर व कृष्णा गीता नगर च्या सर्व कॉलनीवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समारंभाचे सूत्रसंचालन कॉलनीवासी पी.डी.पाटील यांनी केले तर आभार एस. एन. कोळी सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कृष्ण गीता नगर कॉलनीवासीयांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED