खडे बुजवा खडे गंगाखेड नगर परिषद यांना दिले निवेदन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21सप्टेंबर):- शहरातील मुख्य रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दिलकस चौक पर्यन्त तसेच दिलकस चौक पासून बस स्थानक पर्यंतच्या रस्त्याची देनंदिन अवस्था झालेली असून यासंदर्भात अनेकांनी निवेदन देऊन सुद्धा गंगाखेड नगर परिषद प्रशासन मात्र या कडे डोळेजाक करताना दिसते.गंगाखेड बाजारपेठचा हा मुख्य रस्ता असल्या मुळे नागरिकांची वर्दळ असते म्हणून नागरिकांना या मुख्य रस्त्याच्या वापर मोठया प्रमाणात होत असतो परंतु रस्त्या मध्ये खड्डेच खड्डे झाले असून त्या खड्यात पाणी भरल्या नंतर नागरिकांना पायी चालण्यास सुद्धा अवघड होत आहे. वाहन चालकांना किती खडे चुकवून चालवावे याचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी रोज वाहणाची मोठया प्रमाणात वर्दळ असल्याने ट्रॅफिक जाम होत असते.

नागरिकांना याच नाहरकत त्रास सहन करवा लागत असल्या मुळे सदरील रस्ता वाहतूकीस योग्य करण्या साठी येत्या चार दिवसाथ खड्याची तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अन्यथा 25 सप्टेंबर2021रोजी खड्डे भर आंदोलन करणायत यईल असे निवेदन मा. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ गंगाखेड शहर अध्यक्ष शेख खालेद शेख अमीर तसेच सुमित शिवाजी कामत,आकाश माधवराव मोटे, विजय कांबळे, महेश अप्पा शेटे,शेख जमील, सचिन कवठेकर यांच्या स्वाक्षरी ने निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED