चपराळा येथे मानवी वस्तीत बिपट्याचा वावर

30

🔸आष्टी परिसरात वन्यजीव फिरते पथकाकडून जनजागृती

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.21सप्टेंबर):- तालुक्यातील आष्टी शहरा पासून दहा किलोमीटर वर असलेल्या चपराळा गावात रात्रो सवासात वाजता चे दरम्यान किर्तीमंत शेडमाके यांचे शेतवाडीत आरोग्य उपकेंद्र च्या मागे बिबट्या दिसून आल्याने चपराळा गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

चपराळा हे गाव चपराळा वन्य जीव अभयारण्याच्या मध्यभागी असल्याने या गावातील नागरिकांना वन्य प्राण्यांच्या दहशतीत आपले जिवन जगावे लागते आहे रात्रोच्या वेळी कोणते अतिमहत्वांच्या कामाकरीता बाहेर पडायचे झाले तर जिव धोक्यात घालून बाहेर पडावे लागते करीता चपराळा येथील नागरिकांना चपराळा वन्य जीव अभयारण्य कडून मानवी वस्तीत येनारया बिबट्याचा बंदोबस्त करावे अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

या चपराळा अभयारण्यात बिबट्याने मानवी हल्ले व कोंबड्या-बकऱ्या गाई पकडण्याचे आष्टी परिसरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे करीता आष्टी परीसरात बिबट्याची मोठया प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे