रामपूरी येथील गोदाकाठी स्वच्छालयासाठी गेलेल्या पांडुरंग सखाराम कोरडे याचा पाय घसरून गेल्याने गोदावरीत पाण्यात बुडून मृत्यू

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.21सप्टेंबर):- तालुक्यातील रामपुरी येथील पांडुरंग सखाराम कोरडे वय ४९वर्ष हे शारदा विद्या मंदिर बीड शाळेतील शिपाई होता आपल्या मूळ गावी गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे घरी आला होता १८ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता गोदावरी नदीचे काठावर स्वच्छालायास गेले असता त्याचा पाय घसरून पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती ज्ञानोबा दगडू कोरडे वय ४१ वर्ष राहणार रामपुरी व्यवसाय शेती याच्या खबरी नुसार तलवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रामपुरी बीटचे बीट अंमलदार साहायक फौजदार महेंद्रसिंग चव्हाण,यांनी स्वछेदनासाठी जातेगाव प्राथामिक आरोग्य केंद्र येथे मृत्यूदेह पाठविण्यात आले आहे तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना, गुंजाळ पुढील तपास करीत आहेत या दुदैवी घटनेची रामपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Breaking News, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED