आदर्शमाता प्रतिष्ठान चा आदर्श शिक्षक पुरस्कार शोभा खलिपे यांना प्रदान

28

✒️कराड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कराड(दि.21सप्टेंबर):-पाडळी (केसे) तालुका कराड जिल्हा सातारा येथीलआदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार नेवरी तालुका कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.शोभा श्रीकांत खलिपे यांना प्रदान करण्यात आला.सौ.शोभा श्रीकांत खलिपे यांच्या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल त्यांच्या कामाची दखल घेऊन पाडळी केसे येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने कराडचे नवनिर्वाचित तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास निवासी नायब तहसीलदार आनंदराव देवकर, कराडचे मंडलाधिकारी महेश पाटील, सुपनेचे मंडलाधिकारी पंडित पाटील, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास मोहिते, मानवाधिकार न्यायिक महासंघाची सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप मदने कराड तालुका अध्यक्ष सर्जेराव वगरे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ. सुनीता मदने, मुक्ता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय तडाके, ॲडव्हान्स खबर चॅनलचे संपादक अंश खलिपे, तिरंगा रक्षक च्या बातमीदार आदिती वगरे, शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमरदिप खलिपे व सचिव श्रीकांत खलिपे, गौतम ताटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.