रक्तदान शिबीर घेऊन जपली सामाजिक बांधिलकी !…

33

🔸अभिष्टचिंतनाच्या दिवशी ३५ मान्यवरांनी केले रक्तदान..

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.21सप्टेंबर):- येथील समस्त पाटील समाजाचे कोषाध्यक्ष व विकल्प ऑर्गनायझेशनचे समन्वयक लक्ष्मण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वप्रथम लहान माळीवाडा येथील माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील व सर्व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणी, संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सकाळी ०९ः३० वा. रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी धरणगाव शहरातील बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील सर, महासचिव हेमंत माळी सर, किशोर पवार, शिवसेना गटनेते विनय (पप्पू भावे), आराधना हॉस्पिटलचे डॉ. धिरज पाटील, राहुलसिंग राजपूत, विकल्प ऑर्गनायझेशन चे सचिव नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष अमोल महाजन, दिनेश सूर्यवंशी सर, पाटील समाज पंच मंडळाचे संचालक राजेंद्र पाटील (महाले), पत्रकार कमलाकर पाटील, देविदास पाटील, लक्ष्मण पाटील, दिपक मराठे, विकास भोई, विक्रम पाटील, रोहित इंगळे, पितांबर पाटील, प्रफुल पवार, उमेश पाटील, नकुल पाटील, प्रमोद पाटील, राहुल पाटील, आकाश महाजन, सिध्दार्थ बाविस्कर, लोकेश जाला, मनिष चौधरी, दिपक अत्तरदे, अतुल चौधरी, समाधान पाटील, रुपेश मराठे, गोपाल पाटील, दिपक पाटील असे जवळजवळ ३५ मान्यवरांनी रक्तदानाचे बहुमोल कार्य केले. धुळे येथील जीवन ज्योती वेलफेअर अँड मेडिकल केअर संस्था संचलित “जीवन ज्योती ब्लड सेंटर” चे ज्ञानेश्वर पाटील सर व त्यांचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर, नर्स यांनी अनमोल सहकार्य केले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे या भावनेतून या रक्तदान शिबिरात सामाजिक कर्तव्य भावनेने ज्यांनी ऐच्छिक रक्तदान केले त्यांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने लहान माळी वाड्याचे माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन व संचालक मंडळ, समस्त पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, महेश्वर पाटील, लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना गटनेते विनय (पप्पू भावे), भाजपचे गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक विलास माळी, भागवत चौधरी, राष्ट्रवादीचे अरविंद देवरे, मोहन पाटील सर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड. वसंतराव भोलाणे, सुधाकरशेठ वाणी, काँग्रेसचे विकास लांबोळे, रामचंद्र माळी, राहुल मराठे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा सल्लागार कैलास पवार सर, अँड. संदीप पाटील, सचिन पाटील, डॉ. संदीप सराफ, डॉ. धिरज पाटील, डॉ. धनंजय पाटील, डॉ. लिलाधर बोरसे, साईसेवा लॅबचे संचालक महेश पाटील, विलास माळी, अकरम खान, सुहास पाटील, छोटू जाधव, सुनिल चौधरी कैलास पाटील, किशोर पाटील, अशोक पाटील, परशुराम पाटील, आबा पाटील, मोहन पाटील, वाल्मिक (बंटी शेठ) पाटील, रावसाहेब पाटील, आनंदराज पाटील, जितू महाराज, प्रोटानचे तालुकाध्यक्ष सुनिल देशमुख, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, पत्रकार लक्ष्मण माळी, बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे धिरेंद्र पुरभे, राहुल रोकडे, कमलेश बोरसे, बिलखेड्याचे मोहन भदाणे, ऋषिकेश चव्हाण, सचिन पाटील, नामदेव मराठे, प्रथम सूर्यवंशी, चेतन पाटील, भूषण भागवत, अमोल सोनार, अमोल देशमुख, इंद्रसिंग पावरा, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ या सर्व मान्यवरांनी लक्ष्मण पाटील यांना याप्रसंगी बुके व बुक देऊन आणि केक व पेढे भरवून अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने आनंददायी – आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.

येथे झाला वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान :-

लक्ष्मण पाटील जन्मदिनाच्या निमित्ताने शतकोत्तरी संस्था पी.आर.हायस्कूलच्या वतीने शाल, बुके आणि बुक देऊन मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, डी. एस. पाटील, बापू शिरसाठ सर उपस्थित होते. त्याचप्रमाणे हनुमान नगर परिसरात लक्ष्मण पाटील व रावसाहेब पाटील यांचा दोघांचा वाढदिवस सागरभाऊ मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाल, पुष्पगुच्छ देऊन देऊन सत्कार व केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी सर्व युवकांची लक्षणीय उपस्थिती व कार्यक्रमातील उत्साह अवर्णनीय होता. रविंद्र (भैय्या) महाजन, गोपाल माळी, विकास चौहान, यांनी घरी येऊन सत्कार केला. घरी देखील आई – वडील, बहीण, पत्नी, मुले, शालक व त्याच्या मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी औक्षण करून व केक कापून वाढदिवस साजरा झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, अमोल महाजन, नरेंद्र पाटील यांच्यासह लक्ष्मण पाटील मित्र परिवारातील प्रफुल पवार, पंकज पाटील, किशोर पाटील, भूषण पाटील, रुपेश मराठे, गोपाल पाटील, दिपक पाटील, अतुल पाटील, राहुल पाटील, आबा महाजन, अक्षय पाटील, नकुल पाटील, डिगंबर पाटील, हर्षल पाटील, जयेश पाटील, प्रमोद पाटील, हरीश पाटील, मुकेश पाटील, रविंद्र पाटील, पवन पाटील, मुन्ना पाटील मनीष पाटील, जयेश महाजन, सुमित महाजन, हरीष महाजन, प्रथम पाटील, प्रथमेश पवार, लोकेश भाटीया आदींनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराचे आयोजन विकल्प ऑर्गनायझेशन व लक्ष्मण पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.