निराधार लोकांच्या पगार वेळेवर करण्यात याव्यात -राजेश वाहुळे

✒️प्रतिनिधी विशेष(समाधान गायकवाड)

बीड(दि.२१सप्टेबंर):-अंबाजोगाई तालुक्यातील
जवळगाव येथील निराधार लोकांच्या पगारी या आधी बर्दापूर जिल्हा बँकेत होत होत्या त्यात बदल करून जवळगाव येथील बँक ऑफ बडोदा येथे करण्यात आल्या परंतु नऊ महिने उलटूनही पगार मिळत नसल्यामुळे तहसीलदार श्री पाटील साहेब यांना रीतसर निवेदन देण्यात आले पाटील साहेबांनी तात्काळ याची दखल घेऊन संबंधितांचे नावे यादी सामावून घेण्याचे आदेश दिले व लवकरच निराधार लोकांचे पगार होतील असे आश्वासन दिले तसेच जवळगाव ता.अंबाजोगाई येथील रहीवाशी आहेत शासकिय जागेवर घरकुल बांधकाम करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाला आदेशित करण्यात यावे.

या संदर्भातील मुद्दा तहसीलदार पाटील साहेब यांच्या समोर मांडण्यात आला त्यांच्याकडून पूर्ण विषयात सकारात्मक चर्चा होऊन संबंधित निराधारांच्या पगारी लवकरच होतील व शासकीय जागेवर घरकुल कशा मंजूर करून देण्यात येतील याची पूर्ण शहानिशा करून लवकरच आदेश देण्यात येतील असे तहसीलदार साहेब यांनी निवेदन कर्त्यांनी सांगितले निवेदन देतेवेळी लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष राजेश भाऊ वाहुळे युवा नेते दीपक भाऊ कांबळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष मोहम्मद ताहेर लताताई सुभाष भवानी सारजाबाई लोखंडे काशीबाई गव्हाणे केशरबाई गव्हाणे माणिक संभाजी कांबळे मधुकर ठावरे इत्यादी उपस्थित होते.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED