सावधान! एक सतर्कतेचा इशारा

सावधान हा शब्द आपण बरेच वेळा एकतो /वाचतो. बरेच उदाहरणे आहेत.घरात ही बरेच वेळा आपल्याला काही गोष्टींपासून सावधान केल्या जाते. सावधान कशासाठी करतात हे सर्वांनाच माहिती आहे परंतू आपण नियम पाळतो का ? असा प्रश्न निर्माण  झालेला आहे.हल्ली च्या काळात सोशल मिडीयाचा प्रकार खूप वाढलेला असून आपला तरूण वर्ग या सोशल मिडीया वर जास्त दिसेल. इंस्टाग्राम/फेसबुक/शेअरचॅट/ट्विटर या माध्यमातून आजच्या तरूण व तरूणींना फसवल्या जात असून त्यांचा गैरवापर करत असल्याचे दिसून येत आहे.कारण अशा सोशल मिडीयावर तरूणांची फसवेगिरी होत असल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले. भारतात बेरोजगारीची संख्या अधिक असून या युवकांनी आपला वेळ इतर सोशलमिडीया वर खर्च न करता काही तरी उद्योग व्यवसाय करायला पाहिजे, पण असे आढळून येत नाही. महाराष्ट्रात फक्त ३०% युवक आज स्वत:च्या व्यवसायात गुंतलेले दिसतील पण उरलेले ७०% बेरोजगार सोशलमिडीया वर ऑनलाईन असतात.

सोशल मिडीया एक प्रकारचे चांगले आहे की जगभरातील घडामोडी आपल्याला आपल्या मोबाईल द्वारे पाहण्यास मिळतात , वाचनात येतात. परंतू अल्पवयोगटांचे मुले इतर काही अडचणीत अडकलेलेे दिसतात. याचे कारण देखिल सोशलमिडीया आहे. हल्ली सोशलमिडीया वर अनेक महिला पुरूष फसवेगिरी करत असतांना दिसत आहेत. अनोळखी लोकांच्या संपर्कात येण्याचे टाळा , ज्या व्यक्तीला आपण कधी बघितले नाही , ज्या व्यक्तीची आपणास पुर्ण माहिती त्या व्यक्तीमध्ये आजचा युवक आठ ते पंधरा दिवसात मिसळून जातो. हेचं नव्हे तर आपण आपली हद्द ओलांडून बसतो. नंतर या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो.

समोरची व्यक्ती आपल्याला ब्लेकमैल करून पैशाची मागणी करतो. असे बरेच उदाहरण नजरेत आले आहेत. काही युवक/युवतींच्या जिवावर बेतलेल्या अशा घटना समोर येत असतांना दिसत आहेत. मित्रांनो आपले आई वडिल आपल्याला अशा काही गोष्टींचा सतर्कतेचा इशारा आधीच देत असतात पण आपल्याला हे नंतर आठवते , तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
आजच्या तरूण व तरूणींना एक सांगू इच्छितो की जो पर्यन्त आपणास समोरच्या व्यक्ती बद्दल संपूर्ण खात्री होत नाही तो पर्यन्त अशा फसवेगीरी पासून सावधान रहावे. जेणे करून उद्या तुमच्या सोबत काही अनर्थ होऊ नये. काय माहित उद्या ह्याच गोष्टी तुमच्या जिवावर पण बेतू शकतात.

बऱ्याच ठिकाणी मुलगी पळून गेली , किंवा मुलगा पळून गेला असे बातम्या आपल्या कानावर पडतांना दिसतात. पण पळून गेलेला युवक हा आपल्या नात्यात असतो का ? की आपल्या शहरातला असतो? हे आपल्या आजूबाजुलाही नसतात तर यांच्या ओळखी याच सोशल नेटवर्क द्वारे झालेल्या असतात. असल्या गोष्टींमुळे कित्येकांचे संसार उघड्यावर पडले आहेत , तर कित्येक प्रेम युवक युवतींना जिवाची आहुती द्यावी लागलेली आहे. आपल्याला मिळालेल्या सतर्कतेच्या इशाऱ्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्याचेच हे परीणाम आपल्याला दिसुन येतात.
अनेक ठिकाणी आपले आई-वडिल आपल्याला काही कार्य करण्यास टोकतात त्याचा अर्थ असा नाही की तुमचे भविष्य खराब व्हावे ,उलट तुमचे भविष्य कसे उज्वल होईल या कडे त्यांचे जास्त लक्ष असते. मांजर डोळे झाकून दुध पिते तिला वाटते आपल्याकडे कोणाचेे लक्ष नाही. पण ती सर्वांना दिसत असते.

असेच आपल्याबद्दल ही आहे. आपण काय करतो किंवा काय नाही या कडे सर्वांचे लक्ष वेधून असते. फक्त फरक एवढाच की ती वेळ बोलण्यासाठी परफेक्ट नसते. छोट्या छोट्या गोष्टीमुळे आज आपल्या युवकांमध्ये अनेक गोष्टीचे व्यसन लागलेले आहे , पण समजावण्यासाठी वेळ निघून गेलेली असेल, कदाचित आपणाकडे अजूनही वेळ शिल्लक आहे.आपल्याला कोणी “सावधान” करत असेल तर त्या कडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

“एक पाऊल समाज घडवण्याकडे”

शब्दशृंगार ,तू फक्त माझीच

✒️लेखक:-विशाल पाटील,वेरुळकर(मो.९३०७८२९५४२)

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED