सोसायटीच्या बोगस कर्जप्रकरणाची चौकशी करून तात्काळ फेरवसुली करण्याची मागणी

33

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22सप्टेंबर):-मौजे शिंदी बु,ता.माण, जि. सातारा येथील गट नंबर ६०० हि सामायिक मिळकत असून त्यामध्ये बोगस कर्ज प्रकरणाचे उद्देशाने काहींनी तत्कालीन महसुली कर्मचारी याना हाताशी धरून पोकळनोंदी केल्या होत्या या सर्व पोकळ नोंदी मा. तहसीलदार सो दहिवडी यांचे आदेशाने रद्द देखील झाल्या आहेत. प्रत्यक्षात कर्जधारकाचे या क्षेत्रामध्ये कोणतेही डाळिंब पीक नसताना पीकपाणी सदरी डाळिंब दाखवून विकास सेवा सोसायटी शिंदी बु यांची दिशाभूल करून लाखो रुपये कर्ज व कर्जमाफी चा लाभ आज पर्यंत घेतला गेला आहे.

याकामी सचिव शिंदी बुद्रुक यांचे कडे सोसायटी सभासदानी वारंवार लेखी हरकती उपस्तिथ केल्या होत्या. तरी सदर गट नंबर ६०० मध्ये संबंधित कर्जदाराचा कोणताही संबंध नसताना ७/ १२ मधील जुने पीक पाणी उतारे दाखवून संबंधित कर्जदार यांनी विकास सेवा सोसायटी ची फसणूक करून घेतलेली थकीत कर्ज रक्कम तात्काळ शिंदी बुद्रुक विकास सेवा सोसायटी यांनी वसुली वसूल करावी.

शिंदी बुद्रुक विकास सेवा सोसायटी मध्ये ज्या बोगस कर्ज प्रकरणासाठी बोजा चढविला गेला आहे त्या तारण ठेवलेल्या मिळकतीशी आता कर्जदारांचा कोणताही संबंध राहिला नाही त्यामुळे संबंधित बोगस कर्जप्रकरणाची वसुली तात्काळ करून ७/१२ वरील बोजा कमी करावा व शिंदी बु विकास सेवा सोसायटी ची होणारी हानी थांबवावी अशी मागणी शिंदी बुद्रुक येथील सोसायटी सभासद व नागरिकांनी सहायक निंबंधक सहकारी संस्था दहिवडी श्री. शिंदे साहेब यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावर सदर बोगस कर्जप्रकरणाची चौकशी करून तात्काळ वसुली करणेत येईल व दोषींवर नियमानुसार उचित कारवाई करणेत येईल असे आश्वासन श्री.शिंदे यांनी दिले आहे यावेळी आबू खरात, शशिकांत खरात, संजय खरात , राजू खरात , मारुती खरात ,भास्कर खरात अनुसया झेंडे व इतर शेतकरी नागरिक उपस्तिथ होते.